घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

नांदोस गढी उत्खननाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

नांदोस येथील शिवकालीन गढीचे पुरातत्वीय उत्खनन पुरातत्व विभागातर्फे करण्यात येत असून या उत्खननात नवनवीन माहिती समोर येते आहे.आज उत्खनन स्थळाची राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी पाहणी करुन कामकाजाचा आढावा घेतला.

माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री अँड आशिष शेलार दोन दिवसाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून आज त्यांनी जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित होते. यावेळी त्यांनी कुडाळ येथील पंचायत समिती कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केले.

यावेळी आमदार निलेश राणे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत कुडाळमधील व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजचा दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी सर्व विधी पदवीधरांशी संवाद साधून, त्यांचे अभिनंदन केले.

विधी शिक्षणात उत्तम दर्जा जपल्याबद्दल कॉलेज व्यवस्थापनाचे आणि शिक्षकांचे कौतुक केले.यावेळी आमदार निलेश राणे, पुण्याच्या डी.ई.एस. नवलमल फिरोदिया, लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सुनीता आढाव, म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक डॉ. तारक आरोलकर, व्हिक्टर डांटस फाउंडेशनचे अध्यक्ष व्हिक्टर एफ. डांटस कॉलेजच्या प्राचार्य शिल्पा मार्गज, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे आणि कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर उपस्थित होत्या.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित आधार किट वाटप उपस्थित राहून सेवा केंद्राचे वितरण केले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सीताराम तेली, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, सांस्कृतिक विभाग अजय पाटील, दिग्दर्शक दिपक कदम, तहसीलदार सचिन पाटील आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.

त्यानंतर त्यांनी कट्टा येथील शतक महोत्सवी कट्टा पंचक्रोशीत शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमातही सहभागी झाले त्यांच्या हस्ते कला दालनाचे उद्घाटन करण्यात आले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें