घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

आदिशक्तीचे अवतरण:- प.पू.श्री निर्मला देवी माताजी.””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””'(प्रा.संभाजी रामचंद्र लावंड.वाई)

श्री आदिशक्ती मातेचे अवतरण मृत्यूलोकी होणार असल्याचे
स्वर्गातील देवी व देवतांना ज्ञात झाले. देवलोकांत सभेचे आयोजन सुरु झाले होते.असिम शांततेत निराकार देवता व्यक्त होत होत्या. देवतांच्या सव्य व अपसव्य बाजूला पांढऱ्या शुभ्र दाट धुक्यांचे लोट व अलौकिक सुगंध दरवळत होते. प्रथम श्री गणेश, गण, गंधर्व , ब्रम्हदेव, विष्णू, महेश नारद, तुंबर, नंदीकेश्वर, मयुरेश्वर, अष्टसिध्दी, ऋषीमुनी, सनत्कुमार सरस्वती इ.देवतेच्या साक्षीने शंख, सनई, रणभेरी, चौघडा , टाळ, मृदूंग व इतर सुमधुर वाद्यांचे ध्वनी ब्रांम्ही मुहूर्तावर निनांदू लागली.देवी शारदेच्या वीणा वादनाने देवतांचे भार एकालयीत भावविभोर होऊन, सुवर्ण मंडित अशा उंच सिंहासनावर विराजमान झालेल्या आदिशक्ती समोर नृत्य गान करु लागले. आदिशक्तीने आपण मृत्यूलोकी अवतार घेण्याचे प्रयोजन स्पष्ट केल्याने,सकल देवतांनी हर्षभरीत होऊन अवतरणास साह्यभूत व्हायचे असे अंतर्मनाने ठरवून मूळ निराकारात लय पावल्या.
काळाची गरज म्हणून परमेश्वराने दहख आवतार वैदिक आर्यभूमि भरत खंडात घेतले.अवतरणाचे मुख्य
प्रयोजन दुष्ट प्रवृत्तींचा नाश व सज्जनांचे रक्षण करणे असे होते. मच्छ, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, राम,परशूराम, कृष्ण,बौध्द,व कलंकी असे होते. परंतु हे सर्व अवतार पुरुष वाचक पुल्लिंगी स्वरूपाचे होते.बौध्द नंतर कितीतरी शेकडो वर्षांच्या कालावधीनंतर २१ मार्च १९२३ मध्ये दुपारी १२ वाजता भारतातील मध्य प्रदेशातील छिंदवाडा या गावी
आदिशक्तीने श्री निर्मला देवी माताजी या नामकरणाने सगुण रुपात माता कोर्नेलिया पिताश्री श्री प्रसादराव साळवे या ख्रिश्चन दांपत्याचे पोटी जन्म घेतला.श्री प्रसादराव साळवे हे भारतातील शालिवाहन राज्याच्या वंशातील असून,चौदा विद्यांचे अधिपती होते.कुराआन शरिफ या ग्रंथांचे त्यांनी मराठी भाषेत रुपांतर केले होते.ते अध्यात्मिक व सात्विक वृत्तीचे साहित्यिक होते.श्री प्रसादराव साळवे हे स्वतंत्रता सेनानी असून, तत्कालीन नागपूर शहराचे महापौर असल्याने,त्यांच्या घरी डाॅ.वकील, प्रशासकीय शासकिय अधिकारी , देशसेवा करणारे,व काही साहित्यिक लोकांचे उठणे बसणे होत होते.माता कोर्नेलिया या जाधव या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई जाधव यांच्या वंशातील असून, शिक्षित व उच्च विद्याविभूषित होत्या.त्या व्यवहार तज्ञ्ज असून गणित विषयात विशेष पारंगत होत्या. मनाने सात्विक, अतिथी,व अभ्यंगतांची सेवा करीत होत्या.श्री माताजींच्या जन्मकाळी वसंत ऋतूंचे आगमन, होणे,दिवस व रात्र संतुलनात असणे, या नैसर्गिक घटना जुळून आल्या होत्या. कधीकाळी महाकाली राक्षसांशी युध्द करतांना गळ्यातील मोत्यांच्या असंख्य मोत्यांच्या माळा तुटून अनेक मोती पृथ्वीवरील विविध देश विदेशात ओघळून विखुरले जात होते. तेच मोती पूर्वीचे ,आजचे व उद्याचे सहजयोगात येणारे बंधू आणि भगिनीं या होत.त्यांच्या
आईवडिलांना श्री माताजींचे ठायी लहानपणापासूनच दैवी, सात्विक , व वेधवंती सौंदर्य असल्याचे जाणवत होते. मुखमंडलाची आभा,गौरवर्ण, तेजस्वी चमकदार व डोळे बोलके होते. श्री बाल निर्मलाचे प्राथमिक शिक्षण नागपूर जवळील कामठी या गावी झाले होते.लहान वयातच सर्व धार्मिक ग्रंथांचे वाचन व अवलोकन केले होते.तर माध्यमिक शालेय शिक्षण नागपूरमधील नीलसिटी हायस्कूलमधून मॅट्रिक परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या होत्या .मराठी, इंग्रजी व गणित या विषयामध्ये डीस्टिंग्शन (उत्कृष्ट श्रेणी) मिळाली. महाविद्यालयीन शिक्षण लुधियाना येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आणि नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जी.एम.सी.) येथे वैद्यकीय शिक्षण घेतले.मधल्या काळात महात्मा गांधीजींच्या वर्धा येथील आश्रमात आईवडीलांच्या सोबत बऱ्याचवेळा जाऊन आल्या होत्या.संताचा सहवास किती प्रभावी असतो.याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनातही सक्रिय सहभाग घेतला होता. त्यानुसार त्यांना काही दिवस तुरुंगवास भोगावा लागला होता.७ एप्रिल १९४७साली चंडिका प्रसाद श्रीवास्तव यांच्याशी विवाहबद्ध झाल्या.श्री चंडिका प्रसाद श्री वास्तव हे केवळ सनदी अधिकारी नव्हते तर जागतिक प्रशासनाचा मानबिंदू होते. भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे सचिव म्हणून अत्यंत निष्ठेने काम केले.शास्त्रीजींच्या कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक निर्णयात मोलाचा वाटा होता.सर पी.सी.यांनी सलग सोळा वर्षे संयुक्त राष्ट्राच्या( UN). इंटरनॅशनल मॅरिटाइम ऑर्गनायझेशन (IMO)चे सरचिटणीस(Secretary-General) म्हणून पद भूषविले.इतक्या प्रदिर्घ काळासाठी या पदावर राहणारे ते पहिले भारतीय होते.त्यांच्या कार्य व कर्तृत्वाची दखल घेऊन ब्रिटनच्या राणीने नाईट कमांडर( KCMG) ही पदवी देऊन सन्मानित केले.तसेच भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.त्यांच्या संसार वेलीवर यथावकाश दोन सुंदर कळ्यांचा जन्म झाला .श्री माताजींनी कन्या साधना आणि कल्पना यांच्यावर सुसंस्कार केले.संसारातील दोन्ही मुलींचे संगोपन, संस्कार, शिक्षण, नैतिकते बाळकडू पाजले. वयात आलेल्या दोन्हीही मुलींचे विवाह करुन सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर वयाच्या पंचे चाळीशी झाल्यानंतर सहज योगातील कार्यास आरंभकाळ अनुकूल असल्याचे अंतर्यामी ओळखले होते. स्वामी विवेकानंद व रामकृष्ण व इतर थोर साधकांच्या पुस्तकाचे अविरत वाचन केले होते.परंतू त्यात मानवी साक्षात्कारासाठी काहीच सापडलेले नाही.फक्त बौध्दिक पांडित्य जाणवले. मात्र संत साहित्याचा त्यांनी वारंवार आपल्या संभाषणातून गौरव केल्याचे दिसून येतो आहे.भारतीय समाज मनाचे दीर्घकाळ निरीक्षण केले. संतांनी व समाज सुधारकांनी लोक जागृती, मानवता व अस्पृश्यता व अंधश्रद्धा निवारण, केले.पण त्यांचे देहावसान झाले नंतर समाज पुन्हा अंधश्रद्धा, कर्मकांडात दिशाहीन झालेला पाहून त्या खूपच विमनस्क झाल्या होत्या. देवाच्या नावावर आश्रम निर्माण करुन साध्या भोळ्या लोकांचे स्वास्थ हरण करणारे मतलबी, विषयांध ढोंगी, लबाड व धूर्त राक्षसी तामसी प्रवृत्तींच्या शक्त्या, बुवा, महाराज, किर्तनकार प्रवचनकार,व भविष्यकार यांच्या रुपाने उगम पावल्या होत्या. त्यातील आचार्य रजनीश हे एक अधोगतीचे उदाहरण होते .हा इसम महिला स्त्री पुरूषांना संमोहीन करुन लैंगिक शोषण करीत असे.‌ अशा कितीतरी तरुण तरुणींच्या पिढ्या त्याने देश विदेशातील स्वतः बरोबर नरकात ढकलल्या होत्या. नारगोळ याच स्थळी आचार्य रजनीश यांचा कार्यक्रम होता.सदर कार्यक्रमातील झपाटलेले शिष्य समूदायाचे घोळके, महिला व पुरुषांच्या देहादिक विकृत कृती व विचित्र हातवारे करणारे, व्यसनाधिन होऊन जमिनीवर लोळणारे, स्वतःशी बडबडणारे समूदाय पाहून श्री माताजींना अत्यंत खेद,दुःख व मनात घोर निराशा निर्माण झाली होती. कलुशित, मोहमयी व अगुरुंच्या तावडीतून लोकांची सुटका कशी करता येईल? बहकलेल्या व दिशाहीन समाजाला मार्गावर कसे आणता येईल?, या आंतरिक जाणीवेने, वेदनेने व प्रश्नचिन्हाने त्या विशेष अंतर्मुख बनत गेल्या. ही निराशा व विषाद उत्पन्न करणारी घटना कुरुक्षेत्रावर अर्जुनाला ऐन युध्दाच्या वेळी आली होती.आचार्य रजनीशांच्या कार्यक्रमात संम्मिलीत न होता बाहेरुनच त्यांच्या वर्तनावरुन स्थिती समजली.आशा उदास वेळी श्री माताजी नारगोळच्या
समूद्रकिनाऱ्यावर मुकपणे जड अंतःकरणाने एकट्याच चालत होत्या. किनाऱ्यावर पसरलेल्या मऊ रेश्मा सारख्या वाळूत त्यांची पावले उमटत असतानाच मंद व जड होत होती.किनारा मनात पावन व आनंदीत होत होता. मावळतीचा गळा दाटून आला होता. आपल्या आईची अगतिकता पाहून क्षणभर तिलाही भरुन आल्यासारखे वाटले. तिन्ही सांजा होत असल्याने आभाळात ढगांच्या वेगवेगळ्या आकाराच्या रंगी बेरंगी छटा निर्माण होत होत्या. सूर्य देवता अस्ताला जात असताना त्याने श्री माताजींना किनाऱ्यावर अचानक चालताना पाहताच आपल्या रथाच्या वेगावर नियंत्रण ठेवत,अंगावरील उत्तरीय वस्त्र सावरत गतीमान रथावरुन कृतार्थ भावनेने दोन्ही हात जोडून नमस्कार केला.जाता जाता आपल्या सोनेरी किरणांची फुले श्री माताजींवर उधळायला विसरला नव्हता. श्री माताजींच्या सभोवती सोनेरी किरणांची आभा निर्माण झाली. एका बाजूला विशाल पसरलेला समुद्र, सायंकाळच्या वेळी सोनेरी किरणांच्या प्रभावांनी निर्माण होणारे पाण्यावरील चमकदार तरंग उठवत वाराश्री माताजींच्या पायावर नतमस्तक होत होता.आकाशातून पक्षी कुळे पिल्लांच्या ओढीने घरट्याकडे झेपावत होती,आणि माताजी आपल्या मुलांसाठी काय करता येईल या एकाच ध्यासांनी अश्रू भरल्या डोळ्यांनी चालत होत्या.त्या इतक्या अंतर्मुख झाल्या होत्या की, समुद्राच्या गहनतेपेक्षा कितीतरी पटींनी त्या एकाग्रचित्त होत होत्या. गुजरातच्या समुद्राला लागून असलेल्या द्वारकेतील अंतर्गत यादवी युद्ध समाप्ती नंतर श्रीकृष्ण उदास मनाने अवतार समाप्तीसाठी भालूका तिर्थक्षेत्रातील पिंपळवृक्षाखाली भटकंती करीत फिरत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर भारत मातेच्या विरहाने व्याकूळ होऊन इंग्लंडच्या समुद्र किनारी फिरत असताना सागरा प्राण तळमळला ही कविता दु:खा वेगाने उदय पावली होती. सृष्टीमध्ये अशा काही वृक्ष देवता व साक्षात्कारी ठिकाणे आहेत. ती चांगल्या व्यक्तींची आतुरतेने वाट पाहतात. धरणी मातेने धारण केलेले अनेक साक्षात्कारी वृक्ष आज सुध्दा हयातआहेत. औंदुबर वृक्षाच्या सानिध्यात श्री दत्तात्रेयांचा वास व गारवा साधकांना आत्मशांती देतो.तर पिंपळ वृक्ष म्हणजेच बोधी वृक्षांच्या अंतर्यामी श्री विष्णू देवतेचा वास व त्याच्याच छायेत गौतम बुद्धांना करुणा,दया,व विश्वशांतीचा अनुभव व मार्ग मिळाला. वटवृक्षाच्या सानिध्यात साक्षात श्री सदाशिवांचा वास पण कर्मवीर भाऊराव पाटील यांना तो वरदानी ठरला होता. नारगोळ गावापासून थोडे दूर एकांत स्थळी समुद्राने खाऱ्या पाण्याच्या वारंवार चुळा भरुन फेकल्याने घणदाट वाढलेल्या सुरुच्या भयंकर जंगलात एक सुरुचाच वृक्ष अंतर्बाह्य थरारत होता.तो साक्षात आदिशक्ती श्री माताजींची वाट पहात किती तरी वर्षं विरहाने व्याकूळ होऊन ताटकळत उभा राहून तप साधनेत मग्न होता. दिवस मावळत असताना श्री माताजींचे पहिले पाऊल वन प्रदेशात पडताच तो भूप्रदेश उजाळून निघाला होता. मंत्रमुग्ध अवस्थेत त्या नेमक्या सुरुच्या वृक्षाखाली येऊन सहज अवस्थेत समुद्राकडे पाठ करुन विसावल्या होत्या.श्रीकृष्ण वियोगाने राधा कदंब वृक्षाखाली , श्रीरामांच्या वियोगात सीता अशोक वृक्षाखाली अंतर्मुख होऊन बसली होती. तशा श्री माताजी जगत कल्याणाच्या हेतूने आपले कमळा प्रमाणे सुंदर असणारे डोळे, वत्सल मायेने ओथंबलेले नाजूक ओठांच्या पाकळ्या अलगद मिटून घेतल्या. बाह्य विश्वातून येणारे मनातील विचार काढून त्यांनी, चित्ताची एकाग्रता साधली.आपले सर्व चित्त एकवटून ध्यान या प्रक्रियेत स्वतः ला व परिसराला विसरून गेल्या होत्या. भयान एकांतेची त्यांना कसलीच जाणीव नव्हती. मुंगीच्या पावलांनी रात्र पुढे सरकत होती. निरव शांतता जंगला मध्ये पसरत होती. तशी सुरुची झाडे अंधारात बुडून जात होती. आकाशातील चंद्र व चांदण्यांची सुरेख रांगोळी सागरा वर तरंगत होती. भरती व ओहोटीचा खेळ खेळून तो सूध्दा दमला होता. त्याने अंधाराचे पांघरुण अंगावर ओढून घेवून चिडीचूप निद्राधीन झाला होता. दिवस उन्हाळ्याचे असल्याने हवेत उष्णता असून संमीश्र वातावरण तयार झाले होते. पशूपक्षी आपापल्या घरट्यात नि:शब्द झाले होते. सर्व जग निद्रा देवीच्या कुशीत शांतपणे झोपले असताना श्री माताजी मात्र रात्रभर चिंतनात गढून गेल्या होत्या पहाटे ब्रांम्ही मुहूर्तावर स्वत:चे व विश्वाचे सहस्त्रार खुले केले.ही घटना विश्वातील व अध्यात्मिक क्षेत्रातील महान मंगल कार्य होते. ६ मे१९७०या दिवशी नैसर्गिक जगबुडी होणार होती, म्हणून श्री माताजींनी अगोदर दि.५मे.१९७०एक दिवस स्वतःचे व विश्वाचे सहस्त्रार खुले करुन जगाचा होणारा अंत रोखला.सहस्त्रातील अनुभूतीचे वर्णन सहस्रार पूजा फ्रान्स पूजे त त्यांनी स्वतः केले आहे. वाचकांनी ते मुळातून वाचावे व अभ्यासाने आपला उत्कर्ष करुन घेणे ही काळाची गरज आहे.
सहजयोगी प्रा.संभाजी रामचंद्र लावंड.वाई

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें