घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

आशा भोसलेंवर मुंबईत 5 वाजता अंत्यसंस्कार तिकडे पुण्यात बंधू हृदयनाथ मंगेशकर करणार 7 वाजता मोठी घोषणा

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं काल निधन झालं आणि संगीत क्षेत्रातील एक ताराच जणू निखळून पडला. शेवटच्या श्वासापर्यंत आशा भोसले या गात होत्या आणि सर्वांना पुन्हा पुन्हा त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पाडत होत्या.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांवरच त्यांनी मोहिनी घातली होती. दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. आशा भोसलेंवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर हृदयनाथ मंगेशकरांनी मोठी घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.आशा भोसले गेल्या 7 दशकांहून अथक काळ आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी ही चिरतरूण गायिका.. वयाच्या 93 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथेच त्यांनी 12 एप्रिलला अखेरचा श्वास घेतला. 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातील सांगलीत त्यांचा जन्म झाला. होता. आशाताईंवर शिवाजीपार्कवर शासकीय इतामामत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

कधी आणि कुठे होणार पत्रकार परिषद?

आशा भोसलेंवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर हृदयनाथ मंगेशकर पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा करणार असल्याची माहिती आहे. हृदयनाथ मंगेशकर हे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि रिसर्च सेंटर येथे सायंकाळी 7 वाजता होणार आहे. आशा भोसलेंवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर तातडीने हृदयनाथ मंगेशकरांनी पत्रकार परिषद बोलवल्याने सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आशा भोसले यांचा जन्म प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि नाट्य कलाकार पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित दीनानाथ मंगेशकर होते ते स्वतः गायक होते. त्यांच्या आईचे नाव शेवंती होते, त्या गृहिणी होत्या. आशा ताई पाच भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होत्या. त्यांच्या मोठ्या बहिणी लता मंगेशकर आणि मीना खडीकर होत्या. तर धाकटे भाऊ-बहिण उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर आहेत.

हे सर्व संगीत आणि कला क्षेत्रातील प्रतिष्ठित नावे आहेत. यामुळे संगीत विश्वात मंगेशकर परिवाराचे नाव सोन्याच्या अक्षरात लिहिले जाते.11 हजारांपेक्षाही जास्त गाणी गायलीआशा भोसले यांनी 11 हजारांपेक्षाही जास्त गाणी गायली आहेत. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून त्यांना एकूण 7 वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हिंदी, मराठी, बांगला अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. 2000 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आशाताईंनी दिल चीज क्या है, उडे जब जब जुल्फे तेरी, इन आँखोंकी मस्ती अशी अनेक अजरामर गाणी गायली. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें