घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

एका वॉचमनने दुसऱ्याचा गमछाने गळा आवळून केला खून, पुण्यातील धक्कादायक घटना

मध्यरात्री दोन वॉचमनमध्ये झोपण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादात एका वॉचमनने दुसऱ्या वॉचमनचा गमछाने गळा आवळून खून केला. त्यानंतर, खून करणाऱ्यानेच पोलिस नियंत्रण कक्षाला घटनेची ही माहिती दिली.

पांडुरंग भाऊराव खारवणे (वय. ५२, रा.म्हसोबा वस्ती मांजरी) असे खून झालेल्या वॉचमनचे नाव आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी सुदर्शन माणिक काळे (वय २२, रा.तुळजाभवानीनगर खराडी) आला अटक केली आहे.

याबाबत पांडुरंग यांचा मुलगा बाळू (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी (दि. १३) पहाटे अडीचच्या सुमारास स्पॅनोलाइफ सोसायटी, स्वीट इंडिया चौक, खराडी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुदर्शन काळे आणि खून झालेली व्यक्ती पांडुरंग खारवणे हे दोघे खराडी येथील स्पॅनोलाइफ सोसायटीत वॉचमन म्हणून काम करतात. सोमवारी मध्यरात्री दोघांत झोपण्याच्या कारणातून वाद झाला.

वाद एवढा विकोपाला गेला की, काळे याने खारवणे यांच्या डोक्याला बांधलेला गमछा घेऊन त्यांचा गळा आवळला. त्यामध्ये पांडुरंग यांचा जागीच मृत्यू झाला. थोड्या वेळाने भानावर आलेल्या काळे याने आपण काय कृत्य केले, याची त्याला कल्पना आली. त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून ही माहिती दिली.

तत्काळ खराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानुसार, काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने झोपण्याच्या कारणातून झालेल्या वादात पांडुरंग यांचा खून केल्याचे सांगितले. पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सोमय मुंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, साहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक पोटे करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें