घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

आशाताईंच्या अंत्यसंस्काराला एकुलता एक सख्खा भाऊ का नव्हता?

भारतीयांच्या मनावर गेली 70 वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या दिग्गज गायिका सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले अन् आपल्या सुमधूर गायनानं रसिकप्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज अनंतात विलिन झाला आहे.

आशा भोसलेंवर अंत्यसंस्कार झाले अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र बंधू हृदयनाथ मंगेशकर या वेळी उपस्थित नव्हते, त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र अखेर हृदयनाथ स्वत:च ते मुंबईला का गेले नाही याचे कारण सांगितले आहे.

रविवारी 12 एप्रिलला वयाच्या 93 व्या वर्षी आशा भोसले यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर आज लोअर परेल इथल्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. सिनेसृष्टीपासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले.

यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर महत्वाचे नेते तसंच सेलिब्रिटी उपस्थित होते. शासकीय इतमामात पार पडलेल्या अंत्यसंस्कारावेळी पोलीस दलाकडून आशा भोसलेंना सलामी देण्यात आली.आशा ताईंच्या भावंडापैकी यावेळी उषा मंगेशकर, मीना मंगेशकर दोन्ही बहिणी उपस्थित होत्या. मात्र एकुलते एक बंधू हृदयनाथ मंगेशकर यावेळी अनुपस्थित होते, त्यामुळे चर्चांना उधाण आले.

अखेर पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वत: चा सांगितले. हृदयनाथ मंगेशकरांनी आज पुण्यातच पत्रकार परिषद घेत नव्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाविषयी माहिती दिली. त्यावेळी त्यांनी पुण्यात उभारण्यात येणाऱ्या या नव्या हॉस्पिटलला आता लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असे असणार आहे, अशी घोषणा केली आहे.

हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, मी आज मुंबईला असायला हवं होतं पण कधी कधी आपली दु:ख बाजूला ठेवून आधी कर्तव्य पूर्ण करायचे असते. हे दीदींनी (लता मंगेशकर) शिकवलं आहे. त्यामुळे मी सगळी दु:ख विसरून माझ काम केलं आहे.

16 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत यांच्या उपस्थितीत नवीन हॉस्पिटलच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या हॉस्पिटलला आम्ही लता दिदींचे नाव देणार होतो, मात्र आता आशा दिदींचे निधन झाल्याने त्यांच्या नावाचा समावेश हॉस्पिटलच्या नावात करण्यात येणार आहे.. पुण्याजवळील नांदोशी इथं होणाऱ्या नवीन हॉस्पिटलला लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असे असणार आहे, असे हृदयनाथ मंगेशकर म्हणाले.

हॉस्पिटलच्या उद्घटनाला आशाताई येणार होत्या. वडिलांच्या नावावर एक रुग्णालय तर आहेच. आता दीदीबरोबर आणि ताईच्या स्मरणार्थ हे रुग्णालय असणार आहे. हे आशिया खंडातील सर्वात मोठे रुग्णालय असणार आहे. हे हॉस्पिटल 40 एकरांमधे असेल. वेगवेगळे विभाग असतील. त्याचबरोबर रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळा असणार आहे, असे हृदयनाथ मंगेशकर म्हणाले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें