घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

तटकरेंनी सुनेत्रा पवारांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या

दिवंगत अजित पवार हे सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले होते. पण, अजित पवारांची एक इच्छा अपुरी राहिली ती म्हणजे मुख्यमंत्रीपदाची… आता सुनेत्रा पवार राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत.

पण, ‘सुनेत्रा पवारांनी भविष्यात अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण करावे,’ अशी अपेक्षा मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली होती. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आदिती तटकरेंनी उत्तम भावना व्यक्त केली आहे. मी आदिती तटकरेंचं मनापासून स्वागत करते. बारामती मतदारसंघातून शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री झाले होते. अजित पवार ६ वेळा उपमुख्यमंत्री झाले. त्याच मतदारसंघाला पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा मान मिळत असेल तर आम्हाला आनंद आहे.”

आदिती तटकरेंच्या वक्तव्यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी म्हटलं, “अजित पवारांना मुख्यमंत्री होता आलं नाही. सुनेत्रा पवारांना भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर हा त्या पक्षाचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याआधी वारसदार म्हणून एकनाथ शिंदेंपेक्षा सुनेत्रा पवारांची निवड करतात की काय? असं मला त्यांच्या बोलण्यात जाणवतं आहे.”

सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेत बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या, “अजित पवार हे केवळ एक व्यक्ती नाही, तर एक विचार आहेत. त्यांनी या भूमीत अनेक स्वप्न पाहिली आणि ती पूर्णही केली. अजित पवार सहावेळा उपमुख्यमंत्री झाले. मात्र, आता मुख्यमंत्री पाहण्याची वेळ आली आहे. भविष्यात सुनेत्रा पवारांनी अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण करावे.”

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें