घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मंदिर संस्थानचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला अटक, कारणही आलं समोर

त्र्यंबकेश्वर संस्थानचा विश्वस्त आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी पुरुषोत्तम कडलग याला अटक करण्यात आली आहे. महादेवाच्या दर्शनाच्या काळाबाजार प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीसांची कारवाई करण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वीच कडलगच्या पुतण्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका भाविकाकडून दर्शनासाठी 3 हजार रुपये उकळल्याचा पुतण्यावर आरोप होता.नेमकं प्रकरण काय?त्र्यंबकेश्वर मंदिरात ‘व्हीआयपी’ दर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. 11 एप्रिल रोजी पंचवटी परिसरातील अनंता सुरेश मेहंदळे आणि त्यांचे मित्र दर्शनासाठी आले होते.

त्यांनी अधिकृत 200 रुपयांचा देणगी पास घेतला होता. मात्र रांगेत उभे असताना काही संशयितांनी त्यांच्याशी संपर्क साधला.10 मिनिटांत दर्शनाचे आमिष”रांगेतून दर्शनाला 4 ते 5 तास लागतील, आम्ही 10 मिनिटांत दर्शन घडवतो,” असे सांगत संशयितांनी भाविकांना आमिष दाखवले. त्यानंतर त्यांनी 3 हजार रुपये रोख घेत भाविकांना थेट आत प्रवेश दिला.

विशेष म्हणजे, देवस्थान ट्रस्टकडून कोणतीही अधिकृत ‘पेड दर्शन’ सुविधा नसतानाही ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अनंता मेहंदळे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.आरोपींवर गुन्हा, एक फरारया प्रकरणात पोलिसांनी गोटीराम मनाजी पेहरे आणि अभिषेक कडलग (विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांचा पुतण्या) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गोटीराम पेहरे याला अटक करण्यात आली असून अभिषेक कडलग सध्या फरार आहे. तपासादरम्यान या प्रकरणात विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री त्यांना अटक केली.सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नत्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी प्रवेशासाठी कडक नियम आहेत.

सुरक्षारक्षक कोणालाही थेट प्रवेश देत नाहीत. त्यासाठी विश्वस्तांची परवानगी किंवा अधिकृत नोंद आवश्यक असते. प्रत्येक भाविकाची माहिती नोंदवहीत नोंदवली जाते. मात्र एवढी काटेकोर व्यवस्था असतानाही बाहेरील व्यक्ती भाविकांना थेट मंदिरात कशी नेत होती, असा प्रश्न उपस्थित होत होता.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें