घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट पुणे आणि क्युएनएक्स सॉफ्टवेअर सिस्टम्स यांच्यात सामंजस्य करार

पुणे: उद्योग आणि शैक्षणिक विकास अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे यांनी क्यूएनएक्स सॉफ्टवेअर सिस्टम्स, बेंगळुरू यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या कराराने तंत्र शिक्षण, उद्योग आणि तंत्रज्ञानाच्या निर्मितीचा उद्देश साध्य करण्याचा मानस आहे. या सहयोगाअंतर्गत अत्याधुनिक सेन्टर ऑफ एक्सलन्स उभारण्यात येणार आहे.

हा करार जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणेचे प्रभारी संचालक डॉ. एन. बी. हुल्ले, प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता सचिन उमरे, तसेच क्यूएनएक्स सॉफ्टवेअर सिस्टम्स चे इंडिया प्रमुख आणि उपाध्यक्ष राज जैन, पी स्क्वेअर टेक्नॉलॉजीजचे सीईओ श्रीनिवास राजू यांनी स्वाक्षरी केली.

या उपक्रमांतर्गत पदवीच्या सहाव्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी चार क्रेडिटचा उद्योग-संलग्न अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यामुळे शैक्षणिक ज्ञान आणि प्रत्यक्ष उद्योगातील गरजा यामधील दरी कमी होणार आहे. तसेच शिक्षकांच्या कौशल्यवृद्धीसाठी चाळीस तासांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि त्यानंतर दोन महिन्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण असलेला फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात येणार आहे.

या सहयोगातून हॅकाथॉन, लीडरशिप सेशन्स आणि इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग अनुभव मिळणार आहे. या उपक्रमाचा थेट लाभ 240 विद्यार्थी आणि 8 प्राध्यापकांना होणार आहे.

रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष श्री. सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक श्री. श्रेयस रायसोनी, कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर आणि प्रभारी संचालक डॉ. एन. बी. हुल्ले यांनी या करारासाठी टीमचे अभिनंदन केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें