घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यात भव्य संयुक्त अभिवादन सोहळा

पुणे, प्रतिनिधी :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती समिती’च्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी १० वाजता भव्य ‘संयुक्त अभिवादन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत महामानवाला अभिवादन केले.

*मान्यवरांची उपस्थिती :या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार चेतन तुपे आणि माजी आमदार मोहन जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, गणेश बिडकर, नगरसेवक निलेश आल्हाट, ज्येष्ठ नेते बाळासाहेब जानराव, रिपाई शहराध्यक्ष संजय सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, महिपाल वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

*प्रशासकीय व सामाजिक सहभाग :*यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत कुंडलवार आणि समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांच्यासह विविध शासकीय अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात बँड पथकाच्या मानवंदनेने झाली. त्यानंतर बौद्ध भिक्षूंच्या उपस्थितीत सामूहिक बुद्ध वंदना व भीमस्तुती सादर करण्यात आली. शेवटी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

*आयोजन :*कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या सोहळ्यासाठी राहुल नागटिळक, विठ्ठल गायकवाड आणि समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें