घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पोलीस कोठडी टाळायला खरातच्या वकिलाचा जोरदार युक्तिवाद

स्वतःला देवाचा अवतार म्हणवून घेणाऱ्या आणि महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात या भोंदू बाबाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. चौथ्या गुन्ह्याप्रकरणी खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयात ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे हजर करण्यात आले होते.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खरातला १८ एप्रिलपर्यंत (५ दिवस) पोलीस कोठडी सुनावली आहे. खरातच्या वकिलांनी त्याची पोलीस कोठडी टाळण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, खरातने केलेल्या कृत्याने त्यावर पाणी फेरले गेले.

सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात खरातच्या कृत्यांचा भीषण पाढा वाचला. आरोपी महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी आणि पेढा द्यायचा. यामध्ये गुंगीचे औषध मिसळलेले असायचे. महिला बेशुद्ध पडल्यानंतर किंवा अर्धवट ग्लानीत असताना तो त्यांच्यावर अत्याचार करायचा.

“मी देवाचा अवतार आहे, माझ्याशी संबंध ठेवल्यामुळे तू आता पवित्र झाली आहेस,” अशी थाप मारून तो पीडित महिलांची दिशाभूल करायचा ही बाब कोर्टासमोर मांडली.खरातच्या वकिलाच्या जोरदार युक्तिवाद…अशोक खरात विरोधात १४ हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

त्यातील तीन गुन्ह्यात त्याला न्यायलयीन कोठडी मिळाली आहे. तर, चौथ्या गुन्ह्यात त्याचा ताबा एसआयटीनं घेतल आहे.पोलिसांनी खरातची पोलीस कोठडी वाढवून मागण्याची विनंती केली होती. अशोक खरातचे वकील अॅड. सचिन भाटे यांनी मागणीला जोरदार विरोध केला.

मागील गुन्ह्यांमध्येही पोलिसांनी असाच युक्तिवाद केला होता आणि तो तपास झालेला आहे, त्यामुळे पुन्हा कोठडीची गरज नसल्याचे कोर्टासमोर नमूद केले. मात्र, सरकारी वकिलांनी त्याला विरोध करत प्रत्येक गुन्ह्यातील पीडिता वेगवेगळ्या असून गुन्हा वेगळ्या पद्धतीने झाला असल्याचे अधोरेखित केले.

आरोपी खरात हा महिलांच्या मनात भीती घालून, धमकी देत लैंगिक शोषण करत असे. गुंगीच्या औषधात नेमके काय मिसळले होते आणि या भोंदूगिरीसाठी तो कोणत्या रत्नांचा वापर करत होता, याचा शोध घेण्यासाठी ५ दिवसांच्या कोठडीची गरज असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.

न्यायालयात तांत्रिक बिघाड अन् सुनावणीसुरक्षेच्या कारणास्तव खरातला प्रत्यक्ष न्यायालयात हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा आधार घेण्यात आला. सुरुवातीला काही काळ तांत्रिक बिघाडामुळे न्यायालयाचा आवाज खरातपर्यंत पोहोचत नव्हता, त्यामुळे सुनावणी थांबवावी लागली होती. बिघाड दुरुस्त झाल्यावर सुनावणी पार पडली. खरातने पोलिसांच्या मारहाणीचा इन्कार केला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें