घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे ४०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आणि अ‍ॅलिम्को कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सदाशिव पेठेतील फडके हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील तब्बल ४०० ज्येष्ठांना श्रवणयंत्र मोल्ड चे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्राच्या विविध शहरांतून तसेच ग्रामीण भागातून हे ज्येष्ठ नागरिक शिबीरासाठी पुण्यात आले होते.यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सुनील रासने म्हणाले, दगडूशेठ गणपती ट्रस्ट व विविध संस्था, कंपन्या यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे.

केवळ पुण्यातच नाही, तर इतरही शहरातून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावरुनच समाजातील मोठी व्यथा समोर येत असल्याचे दिसून आले आहे. आजच्या कार्यक्रमात ४०० रुग्णांना यंत्र देण्यात आले.

ते पुढे म्हणाले, कानाच्या विकारांप्रमाणेच विविध आजार, कृत्रिम अवयव यांसह सर्व प्रकारची वैद्यकीय मदत ट्रस्टच्या माध्यमातून साततयाने केली जात आहे. जय गणेश रुग्णसेवा अभिनायाच्या माध्यमातून लाखो गरजू रुग्णांना लाभ होत असून समाजाच्या तळागाळात पोहोचण्याचा ट्रस्टचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आणि अ‍ॅलिम्को कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सदाशिव पेठेतील फडके हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील तब्बल ४०० ज्येष्ठांना श्रवणयंत्र मोल्ड चे वाटप करण्यात आले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें