आसरे : कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक आसरे विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये श्री. विक्रांत (भैय्यासाहेब) डोंगरे (सभापती, पंचायत समिती वाई), सौ. रंजनाताई डगळे (माजी सदस्य, जिल्हा परिषद सातारा), श्री. सुरेश (दाजी) सणस (समाजसेवक, मुंबई), श्री. दिनकर (दादा) सणस (संचालक, रोहिडेश्वर शिक्षण संस्था), श्री. बबनराव (दादा) सणस (माजी सरपंच), श्री. अनिल पाटणे (सामाजिक कार्यकर्ते, वेलंग) तसेच विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. सकटे सर, सौ. पल्लवी सकटे मॅडम, श्री. सय्यद सर, श्री. दाहोत्रे सर व श्री. संतोष डगळे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे व विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी, असे मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.
पंचायत समिती वाईचे सभापती पैलवान विक्रांत (भैय्यासाहेब) डोंगरे यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा करत असलेल्या प्रयत्नांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महान कार्याची माहिती देत त्यांच्या विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. रंजनाताई डगळे यांनीही शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत शिक्षक व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. त्यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत समाजातील त्यांच्या योगदानाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते व विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.











