घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर ७ जणांचा कोयत्याने हल्ला

नाशिकमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या घटनांनी डोकं वर काढलं आहे. शहरातील सिडको परिसरात सोमवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली.शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे विभागप्रमुख सुयश पाटील यांच्यावर ६ ते ७ जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप वार केले.

या भीषण हल्ल्यात पाटील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुयेश पाटील यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. पाटील यांच्यावर हल्ला का केला? याचा तपास नाशिक पोलीस करत आहे.

नाशिकमधील सिडकोतील दत्त चौक परिसरात सुयेश पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. रात्री उशिरा सुयश पाटील सिडको परिसरात होते. त्याचवेळी अचानक आलेल्या सहा ते सात जणांच्या टोळक्याने पाटील यांच्यावर धारधार कोयत्याने सपासप वार केले. सुयश पाटील यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या कार्यालयाचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आणि तिथून पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि दहशतीचे वातावरण पसरले.

नाशिकमधील स्थानिक सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुयेश पाटील यांच्यावर झालेला हा हल्ला जुन्या भांडणाच्या कुरापतीतून झाला असेल असा संशय व्यक्त केला जात आहे. पाटील यांच्यावर हल्ला करण्यासाठी टोळके पूर्ण तयारीनिशी आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये तीन हल्लेखोर स्पष्टपणे कैद झाले आहेत. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे.

सुयेश पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी नाशिकमधील अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. आरोपींना पकडण्यासाठी नाशिक पोलिसांनी विविध पथके तयार केली आहेत. गर्दीच्या ठिकाणी एखाद्या राजकीय पदाधिकाऱ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे नाशिकच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे.

सहा ते सात जणांच्या प्राणघातक हल्ल्यात शिंदे गटाचे पदाधिकारी सुयेश पाटील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. सध्या सुयश पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सुयेश पाटील यांच्यावर हल्ला झाल्यानंतर स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी अंबड पोलिसांनी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें