घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पश्चिम भागातील शेती पाणी प्रश्न सोडवणे गरजेचे – रोहित वाडकर (वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे)

वाई : धोम-बलकवडी धरणाच्या माध्यमातून पश्चिम भागात दोन मोठे प्रकल्प साकारले गेले असून हा भाग जलमय झाला असला, तरीही अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध होणे हे अनेक गावांसाठी अजूनही स्वप्नवत असल्याची खंत रोहित वाडकर यांनी व्यक्त केली.
जललक्ष्मी योजनेत अनेक त्रुटी असून ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः जललक्ष्मीच्या उजव्या तिरावरील चिखली गाव अजूनही सुमारे ६० टक्के पाणीपुरवठ्यापासून वंचित आहे. ही पाटबंधारे विभागाची मोठी चूक असून ती तातडीने दुरुस्त करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. चिखली परिसरातील वाड्या-वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचल्यास ५० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र ओलीताखाली येऊ शकते. यासंदर्भात धोम पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. महामुनी यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
याचबरोबर, जांभळी बंधाऱ्याची उंची वाढू शकत नाही हा केवळ राजकीय दिशाभूल करणारा दावा असल्याचा आरोपही रोहित वाडकर यांनी केला. जांभळी बंधाऱ्यावरील केटीवीरचे काम अद्याप अर्धवट असल्याने बंधाऱ्याची उंची नेमकी कधी वाढणार आणि त्यात किती पाणी साठणार, हा प्रश्न अनुत्तरित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बंधाऱ्याची उंची वाढवून पश्चिम भागावर आणखी एक प्रकल्प आणि पुनर्वसनाचा बोजा टाकू नये, असे मतही त्यांनी मांडले.
जांभळी बंधाऱ्यातून बंदिस्त पाइपलाईनद्वारे उजव्या बाजूला वासोळे आणि डाव्या बाजूला वडवलीपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी सध्या सर्वेक्षण सुरू असून, त्याचा प्रस्ताव तयार करून मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धोम परिसरातील खावली, रेणावळ, आसरे, वेलंग, अभेपुरी, वडाचीवाडी, पाचपुतेवाडी या गावांमध्येही शेती पाण्याचा प्रश्न तीव्र आहे. या भागांना जांभळी बंधाऱ्यातून थेट पाणी देणे शक्य नसल्याने सिंचन विभागामार्फत लिफ्ट इरिगेशन स्कीम (LIS) राबवून पाणी पुरवठा करावा लागणार आहे. यासाठी जबाबदारीने पाठपुरावा करून पश्चिम भागातील धरणग्रस्तांना न्याय मिळवून देणार असल्याचे रोहित वाडकर यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें