घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

शस्त्र बाळगल्या प्रकरणी तडीपार गुंडाला अटक

तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश करणाऱ्या आणि बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

ही कारवाई मंगळवारी (१४ एप्रिल) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास संत तुकारामनगर येथील एच. ए. मैदानाजवळ घडली.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जावेद मुजावर यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पवन सचिन ससाणे (२१, गांधीनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला ऑक्टोबर २०२५ मध्ये दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार करण्यात आले होते.

मात्र, प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता त्याने शहरात प्रवेश केला. त्याच्याकडे ४०० रुपये किमतीचा धारदार लोखंडी कोयता मिळून आला असून तो एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबला असल्याचे निष्पन्न झाले आहे. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें