घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

विहिरीत तरंगत होता चिमुकलीचा मृतदेह, माताच निघाली आरोपी

पालम तालुक्यातील पुयणी येथे आपल्या ६ ते ८ महिन्यांच्या मुलीला विहिरीत फेकून तिचा खून करणाऱ्या आईला गंगाखेड येथील अपर सत्र न्यायाधीश-१ डी. डी. कुरूलकर यांनी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली.

२६ ऑक्टोबर २०२२ रोजी नगरपंचायत पालम येथील पाणीपुरवठा लिपिक सय्यद हुसैन कासीम हे पंप बिघडल्याने विहिरीवर गेले होते. त्यावेळी त्यांना विहिरीच्या पाण्यावर एका बालिकेचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी ही बाब तत्काळ पालम पोलिसांना कळविली. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ व २०१ अन्वये गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याचा तपास फौजदार एम. यू. कारवार यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यांनी या गुन्ह्याची उकल केली. आरोपी शामला गंगाधर जाधव हिने आपल्या पोटच्या मुलीला जिवंत असताना विहिरीत फेकून दिल्याचे समोर आले. यानंतर तिच्याविरुद्ध गंगाखेड येथील न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. तर बचाव पक्षातर्फे ४ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीचा जबाब, परिस्थितीजन्य साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष यात महत्त्वाची ठरली.न्यायाधीश कुरूलकर यांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून शामला गंगाधर जाधव हिला भादंविच्या कलम ३०२ अन्वये सश्रम जन्मठेप व एक हजार रुपये दंड तसेच कलम २०१ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दोन्ही शिक्षा एकत्रित भोगण्याचे आदेश दिले. या प्रकरणात सहायक सरकारी अभियोक्ता एस. वाय. पौळ यांनी युक्तिवाद केला. तर कोर्ट पैरवी म्हणून अंमलदार एल. व्ही. मुंढे, जे. एच. पठाण व एम. डी. कुंडगीर यांनी काम पाहिले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें