पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड कात्रज आगार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
कात्रज डेपोचे आगार व्यवस्थापक माननीय राजेंद्र गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
माननीय पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड चे झोनल मॅनेजर माननीय दडस साहेब यांनी सर्व कामगार बंधूंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती विषयी शुभेच्छा दिल्या यावेळेस स्वारगेट मुख्यालयाकडील जनता संपर्क अधिकारी माननीय नागेश गायकवाड तिकीट तपासणी श्री सतीश वाघमारे तिकीट तपासणीस माननीय खांडरे साहेब तसेच मुख्य तिकीट तपासणी मुकुंद पवार यांनी कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली.
कात्रज भागातील नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे यांनी सर्व कामगारांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी आयोजक दत्ताभाऊ हिंगे ,संजय कांबळे, अभिमन्यू इजगज, चंद्रकांत वाघमारे ,लंकेश ,दिलीप कोल्हे, राजेंद्र गरुड या सर्वांनी आथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.












