घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

लेकीच्या मानेवरच्या जखमांनी आईचे काळीज चिरले!

शाळकरी मुलगीवर एकाने पिंप्री (ता. धरणगाव) येथे अत्याचार केला. जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षे नऊ महिने पाच दिवस वयाची शिक्षण घेणारी अल्पवयीन ) मुलगी शिक्षणासाठी शहरात ये-जा करीत होती.

तिची ओळख तेजस गजानन हिरे (रा. पारगाव, ता. चोपडा) याच्याशी झाली.सोमवारी (ता. १३) मुलगी विद्यालयात जाते, असे सांगून घराबाहेर पडली. तिच्या मैत्रीचा गैरफायदा घेत तेजसने खोटे बोलून दुचाकीने पिंप्री (ता. धरणगाव) येथील त्याच्या आजीच्या घरी नेले. तेथे तिचे हात स्कार्फने बांधून तिच्यावर अत्याचार केला.

प्रतिकार, मारहाण, धमकीपीडितेने प्रतिकार केला. मात्र, संशयिताने तिला माराहाण केली. तिची मान व चेहऱ्यावर ओरबाडले. पीडितेला घरी सोडताना सांगितल्यास जिवाची भीती दाखविली. पीडिता घरी आल्यावरही शांत राहिली.

मुलगी घरात उशिराने आली. सकाळी घरातून जाताना नीटनेटकी गेली होती. तिला विस्कळितपणाबद्दल विचारणा केल्यावरही मुलगी काहीच बोलली नाही. आईला टाळण्याचा प्रयत्न करत खोलीत जाऊन नीटनेटकी होऊन कपडे बदलून आली.

मात्र, आईने तिला जवळ बोलवून बघितले, तर तिच्या मानेवर ओरबाडल्याच्या जखमा दिसून आल्या.हुंदके देतच सांगितला प्रसंगपीडितेच्या आईने संतापातच अंगावरील जखमांची विचारणा केल्यावर पीडितेच्या भावनांचा बांध फुटला व ती हुंदके देतच उत्तरली. मुलीवर गुदरलेल्या प्रसंगाचे कथन ऐकून आईच्या पायाखालची जमीन सरकली.

तत्काळ स्वतःला व मुलीला सावरत आईने पोलिस ठाणे गाठून घडला प्रकार कथन केला. पीडितेच्या जबाबावरून संशयित तेजस गजानन हिरे याच्याविरुद्ध पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक योगिता बोराडे तपास करीत आहेत. संशयिताला अटक केली असून, पुरावे संकलनासाठी पथक रवाना केले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें