घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

झटक्यात कॅन्सर बरा करतो म्हणणाऱ्या संगमनेरच्या भोंदूबाबाला बेड्या

राज्यात आणि देशात चर्चेचा विषय ठरलेल्या अशोक खरात याच्याबद्दल नवनवी माहिती समोर येत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरच्या राजेंद्र गडगे यानेही उच्छाद मांडला होता.श्रद्धेच्या नावाखाली भोळ्या भक्तांकडून हजारो रुपयांची लूट करणाऱ्या आणि झटक्यात कॅन्सर बरा करतो म्हणणाऱ्या राजेंद्र गडगे याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.

मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा संगमनेरचा राजेंद्र गडगे करायचा. त्याच्याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्रमक पवित्रा घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.अखेर गडगेचे पराक्रम पाहून पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायदा, आयटी कायदा, ड्रग्ज अॅन्ड मॅजिक रेमेडी अॅक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्ट, बनावट व्हिडिओ बनवणे यासह भारतीय न्याय संहितेअंतर्गत कारवाई केली. अंनिसच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी फिर्याद दाखल केली.

कोण आहे राजेंद्र गडगे, भक्तांना कसा फसवायचा?संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील दत्तधाममध्ये एक तथाकथित महाराज मंत्रोच्चार करून शारीरिक आजार बरे करत असल्याचा दावा करत असल्याची माहिती समोर आली. स्वतःला गडगे महाराज म्हणून ओळख करून देणाऱ्या या व्यक्तीभोवती मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होत होती.

त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. क्षणात आजार बरे होतात म्हणून लोकांची त्याच्याकडे तोबा गर्दी होत असे.राजेंद्र गडगे याच्याबरोबर त्याच्या मुलीवरही गुन्हालोकांच्या धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन तो अनेकांकडून ११ हजार, २१ हजार, ५२ हजार, अशा रकमा घेऊन फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि अंनिसने त्याच्यावर कारवाईची मागणी केली.

राजेंद्र गडगे याच्याबरोबरच त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, सुरज शिंदे, मधुकर शिंदे, डॉक्टर मोहन पुरी यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटकेची कारवाई केली.

आर्थिक लूट करून गडगे महाराजाने साम्राज्य उभं केलंसंगमनेरमधील दत्तधाम सरकार नावाने गडगे महाराज याने साम्राज्य उभे केले. भोळ्या भक्तांना फसवून त्याने हजारो रुपये उकळले. कोणतेही मेडिकल सायन्स माहिती नसताना त्याने भक्तांना आजार बरा करण्याचे आश्वासन देऊन पैसे उकळण्यासाठी नाटक केले. या माध्यमातून त्याने लाखोंची संपत्ती जमा केली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें