घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

TCS कंपनीचा मोठा निर्णय; लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे BPO सेंटर बंद, कर्मचाऱ्यांना WFH देणार

नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS) BPO सेंटरमध्ये गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. लैंगिक अत्याचार, मानसिक छळ आणि जबरदस्ती धर्मांतराच्या आरोपांमुळे हे सेंटर तात्पुरते बंद करण्यात आले असून कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या प्रकरणात आतापर्यंत किमान 8 महिला कर्मचाऱ्यांनी पुढे येत गंभीर आरोप केले आहेत.त्यांच्या मते, अनेक वर्षांपासून ऑफिसमध्ये लैंगिक छळ, मानसिक त्रास आणि धार्मिक दबाव टाकला जात होता. काही महिलांनी तर जबरदस्तीने विशिष्ट अन्न खाण्यास आणि धार्मिक प्रथांमध्ये सहभागी होण्यास भाग पाडल्याचा आरोपही केला आहे.’

गँग’प्रमाणे काम करणारे आरोपीनाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात 7 पुरुष आरोपी एकत्रितपणे ‘गट’ म्हणून काम करत होते. हे आरोपी ऑफिसमधील महिलांना लक्ष्य करत असल्याचा संशय तपासातून समोर आला आहे.

9 FIR दाखल8 आरोपींना अटक (7 पुरुष, 1 महिला)आणखी एक महिला आरोपी फरार झाली आहेअटक करण्यात आलेल्यांमध्ये काही जण टीम लीड पदावर होते, ज्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.HR वरही गंभीर आरोपया प्रकरणात एका HR अधिकाऱ्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

तिने पीडितेला तक्रार न करण्याचा सल्ला दिला आणि आरोपींचे समर्थन केल्याचे समोर आले आहे.मोठ्या तपास यंत्रणांची एंट्रीया प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, पोलीसांनी National Investigation Agency (NIA), ATS आणि State Intelligence Department यांच्याशी संपर्क साधला आहे. या प्रकरणामागे मोठं जाळं किंवा आर्थिक व्यवहार आहे का, याचाही तपास सुरू आहे.

पहिल्या पीडितेने सुरुवातीला तक्रार देण्यास संकोच केला होता. पण पोलिसांच्या मदतीनंतर इतर महिलाही पुढे आल्या आणि प्रकरण उघडकीस आलं. महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना ऑफिसमध्ये तैनात करण्यात आलं आहे, जेणेकरून पीडित महिलांना सुरक्षित वातावरण मिळेल.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत National Commission for Women (NCW) ने स्वतःहून तपास सुरू केला आहे. 18 एप्रिल रोजी समिती प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन चौकशी करणार आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें