घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

राहुल साठे यांच्या दमदार सादरीकरणाने रंगला संयुक्त जयंती महोत्सव

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथे आयोजित संयुक्त जयंती महोत्सवात भीमगीतांनी वातावरण भारावून गेले. विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) यांच्या वतीने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, बोपोडी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीतील लोकप्रिय गायक आयकॉन स्टार राहुल साठे आणि त्यांच्या टीमने सादर केलेल्या दमदार भीमगीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. विजय खरे, समितीचे अध्यक्ष, उपमहापौर परशुराम वाडेकर, रिपब्लिकन पक्षाचे अविनाश कदम, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, संदीप धांडोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

“प्रथम तुज वंदना”, “पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे”, “सोनियांची उगवली सकाळ”, “माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का”, “किती शोभला असता भीम नोटांवर”, “माझ्या भीमाची पुण्याई”, “जिवाला जीवाच दान”, “भीमाची लेखणी”, “नांदण नांदण नंदन” आणि “माझ्या भीमाच्या नावाचं” या गीतांनी संपूर्ण परिसरात उत्साहाची लहर निर्माण केली.

याशिवाय “भले भले पुढारी करतात भीमाला सलाम” या गीतासह विविध सादरीकरणांना प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. ओमप्रकाश सोनवणे आणि अभिजीत भवर यांनीही आपल्या सादरीकरणातून कार्यक्रमात रंगत आणली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें