घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

काॅलेजसमोरील खाऊ गल्लीत पालिका कामगारावर सॅन्डविच विक्रेत्याचा हल्ला

डोंबिवली पूर्व एमआयडीसी भागातील के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय आणि माऊल हाॅलमधील अरूंद रस्त्यावर खाऊ गल्ली आहे. दररोज संध्याकाळी चार ते रात्री उशिरापर्यंत या खाऊ गल्लीत सुमारे १०० हून अधिक विविध खाद्यपदार्थांच्या हातगाड्या रस्ता अडवून विक्रेत्यांकडून लावल्या जातात.

या बेकायदा खाऊ गल्लीवर शुक्रवारी पालिकेच्या ई प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकाने कारवाई केली. यावेळी संतप्त झालेल्या एका सॅन्डविच विक्रेत्याने एका पालिका कामगारावर बांबूच्या काठीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.सुरेश कामराज असे पालिका फेरीवाला हटाव पथकातील कामगाराचे नाव आहे. चंद्रकांत कदम असे मारहाण करणाऱ्या सॅन्डविच विक्रेत्याचे नाव आहे. या हल्ल्यात कामगार कामराज जखमी झाला. त्यांना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणाची कामगाराने तक्रार केली आहे. कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीतील रस्ते, पदपथ नागरिकांसाठी चालायला मोकळे असले पाहिजेत. यासाठी रस्ते, पदपथ अडवून बसणाऱ्या सर्व प्रक्रारच्या फेरीवाले, विक्रेते, हातगाडी, टपरी चालक यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रभाग साहाय्यक आयुक्त यांना दिले आहेत.खाऊ गल्लीत कारवाईपेंढारकर महाविद्यालय आणि माऊली सभागृहालगतच्या अरूंद रस्त्यावरील खाऊ गल्लीमुळे नागरिक त्रस्त आहेत. सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर ही खाऊ गल्ली आहे. वाहन चालकांना या खाऊ गल्लीचा अडथळा येतो. या भागात रूग्णालये, सभागृह, महाविद्यालय, शाळा आहेत. त्यामुळे शाळेच्या बस, रुग्ण वाहिका, सभागृहात विविध कार्यांसाठी येणाऱ्या नागरिकांना या खाऊ गल्लीतील हातगाड्यांचा अडथळा येतो. या खाऊ गल्लीत १०० हून अधिक हातगाड्या आहेत. संध्याकाळी चार वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत डोंबिवली शहर परिसरातील तरूण, तरूणी, कुटुंब याठिकाणी खिमापाव, पाणीपुरी, वडापाव, भेळ, दाबेली असे विविध प्रकारचे जिन्नस खाण्यासाठी याठिकाणी येतात.

हे ग्राहक हातगाडी समोर आपली दुचाकी, चारचाकी गाडी उभी करतात. त्यामुळे खाऊ गल्लीच्या अरूंद रस्त्यावर वाहन कोंडी होते. शिळफाटा रस्त्याने येणारी अनेक वाहने पेंढारकर महाविद्यालयासमोरील रस्त्यावरून सावित्रीबाई फुले रस्त्याने ठाकुर्ली, ९० फुटी रस्त्याकडे जातात. रुग्णवाहिका या रस्त्यावरून धावतात. त्यांना या हातगाड्या, गर्दीचा अडथळा येतो.

ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली फेरीवाला हटाव पथकाने शुक्रवारी संध्याकाळी पेंढारकर महाविद्यालयातील खाऊ गल्लीतील हातगाड्या हटविण्यासाठी कारवाई केली. हातगाड्या जप्त करून त्या टेम्पोत टाकत असताना एक सॅन्डविच विक्रेता चंद्रकांत कदम यांची हातगाडी जप्त करून ती टेम्पोत टाकत असताना कदम तेथे आले. त्यांनी आपल्या हातगाडीला हात का लावला, असे प्रश्न कामगारांना करत तेथील बांबूची काठी घेऊन त्या काठीने फेरीवाल हटाव कामगार सुरेश कामराज यांना बेदम मारहाण केली. इतर कामगारांनी मध्यस्थी करून कदम यांना दूर करण्याचा प्रयत्न केला, तरी ते कामराज यांना मारहाण करण्यासाठी धावत होते. या हल्ल्यात कामराज यांच्या हात, डोक्याला दुखापत झाली आहे.

ही घटना घडुनही फेरीवाला हटाव पथकाने या हल्ल्याची पर्वा न करता खाऊ गल्लीतील हातगाड्या जप्त केल्या. या गल्लीत यापुढे एकही हातगाडी लागणार नाही याची काळजी पालिका पथकांनी घ्यावी अशी मागणी प्रवासी करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें