घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू

गजबजलेल्या मनमाड रेल्वेस्थानकात शुक्रवारी (दि.१७) दुपारी एक माथेफिरू ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढल्याने अनेकांचा काळजाचा ठोका चुकला. घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने तत्काळ विद्युत पुरवठा बंद करत सदर माथेफिरूला खांबावरून खाली उतरविले.

यावेळी काही गाड्यांचे फलाट बदलून त्या मार्गस्थ करण्यात आल्या.मनमाड रेल्वेस्थानकात रोज दीडशे गाड्या देशभरातून येत-जात असतात. शुक्रवारी एका गाडीतून एक अंदाजे ३० वर्षे वयाचा मनोरुग्ण तरुण मनमाड स्थानकात दाखल झाला.

दुपारच्या भर उन्हात अडीच तीन वाजेच्या सुमारास तो प्लॅटफॉर्मवरील छतावरून धावू लागला आणि त्यानंतर ओव्हरहेड इलेक्ट्रिकच्या खांबावर जाऊन चढला. याठिकाणी जाणारा वीज प्रवाह अति उच्च दाबाचा असतो.या विजेच्या तारांपासून एक-दोन फूट अंतरावर जरी माणूस गेला तरी शॉर्टसर्किट होऊन जागीच मृत्यू ओढवतो.

त्यामुळे प्रसंगाचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाकडून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. तात्पुरती अर्थिंग देण्यात आली. ओव्हरहेड इलेक्ट्रिक विभागाची टॉवर वॅगन मागविण्यात आली व शिडी-दोराच्या साहाय्याने कर्मचाऱ्यांनी खांबावर चढत दोन तासांच्या प्रयत्नानंतर मनोरुग्णाला खांबावरून खाली उतरविले.

या थरारामुळे मनमाड स्थानकावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना काही गाड्यांचे प्लॅटफॉर्म बदलण्यात आले, जेणेकरून वाहतूक विस्कळीत होणार नाही. दोन तासांनंतर या माथेफिरूला जेरबंद करण्यात आले आणि रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें