घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

वासंतिक उटी उत्सव व भव्य सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

आपल्या परिसरातील श्री सिद्धिविनायक मंदिर, दत्तनगर, आंबेगाव येथे आज वासंतिक उटी उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात संपन्न झाला. वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.

उत्सवानिमित्त देवतेस सुगंधी उटी अर्पण करण्यात आली. चंदन, केवडा, गुलाब यांसारख्या सुगंधी द्रव्यांनी देवतेची पूजा करण्यात आली. यावेळी मंदिरात भजन, कीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

सायंकाळी महाआरती व उटीचे भजनही मोठ्या उत्साहात पार पडले.याच वेळी आयोजित भव्य सन्मान सोहळाही यशस्वीरीत्या संपन्न झाला. आपल्या परिसरातील प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि गुणवत्तेचा गौरव करण्यासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.

पी.एम.पी.एम.एल. बसचे चालक श्री. संकेत राजेंद्र गारुळे व वाहक श्री. अभिमन्यू रवींद्र खंदारे यांनी हरवलेली सुमारे २ तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स संबंधित महिला भगिनीस प्रामाणिकपणे परत करून दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

तसेच आंबेगाव परिसरातील सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार विजेते कु. स्वराज विजय कोळेकर यांचाही यावेळी भव्य सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास मा. शरद झिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आंबेगाव पोलीस स्टेशन यांच्या शुभहस्ते,ह. भ.प. माऊली जंगले व मा. नगरसेवक श्री. शंकरराव विठ्ठलराव बेलदरे पाटील यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमास स्थानिक नागरिक, मान्यवर तसेच भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक व शैक्षणिक प्रतिष्ठान, अखिल दत्तनगर तरुण मित्र मंडळ तसेच सर्व विश्वस्त, पदाधिकारी, सेवेकरी व कार्यकर्ते बंधू-भगिनी यांच्या वतीने करण्यात आले. आपलाच,श्री.रोहन शंकरराव बेलदरे पाटील अध्यक्ष -अखिल दत्तनगर तरुण मित्र मंडळ व विश्वस्त श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक व शैक्षणिक प्रतिष्ठान

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें