वाई शहरातील ब्राह्मण समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तसेच भगवान परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी वाई येथील किसनवीर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज व भगवान परशुराम यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भक्तिभावाच्या वातावरणात करण्यात आली.
“छत्रपती शिवाजी महाराज की जय” व “भगवान परशुराम की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, धैर्य व आदर्श राज्यकारभाराचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच भगवान परशुराम यांच्या कार्याचा गौरव करत ते पराक्रम, धर्मरक्षण आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे प्रतीक असल्याचे सांगितले. त्यांच्या जीवनातून सत्य, शौर्य व कर्तव्यनिष्ठेचा आदर्श समाजाने घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यानिमित्त समाजात एकात्मता व संस्कार जपण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास ब्राह्मण समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
सकाळी साडेसात वाजता भगवान परशुराम यांच्या मूर्तीचे अभिषेक व आरती करण्यात आली. तसेच संध्याकाळी साडेपाच वाजता विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न होणार असून, स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. शेवटी उपस्थितांना पन्ह व प्रसादाचे वाटप करण्यात आले.











