घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

उद्यापासून ‘या’ 5 विभागांचा पाणीपुरवठा 18 तास राहणार बंद

मुंबईच्या दक्षिण आणि मध्य भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने शिवडी येथे महत्त्वाचे तांत्रिक काम हाती घेतले आहे. शिवडी येथील हाजी बंदर मार्गावर १,५०० मिमी व्यासाचे दोन नवे ‘बटरफ्लाय व्हॉल्व’ बसविण्यात येणार आहेत.

त्यामुळे बुधवारी (ता. २२) सकाळी १० वाजल्यापासून गुरुवारी (ता. २३) पहाटे चारपर्यंत म्हणजे जवळपास १८ तास मुंबईतील ए, बी, सी, ई आणि एफ-दक्षिण या पाच विभागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

विभागनिहाय पाणी कुठे नाही?

‘ए’ विभाग : पी. डिमेलो मार्ग, रामगड झोपडपट्टी, सीएसएमटी परिसर, सेंट जॉर्ज रुग्णालय, नौदल डॉकयार्ड आणि आरबीआय परिसरात बुधवारी पाणीपुरवठा बंद

‘बी’ विभाग : उमरखाडी, नूरबाग, चिंच बंदर, मशीद बंदर, दाणा बंदर आणि वाडी बंदर परिसरात बुधवारी, तर महम्मद अली रोड, मशीद बंदर स्थानक परिसरात गुरुवारी पहाटे पाणीपुरवठा बंद

‘सी’ विभाग : दक्षिण मुंबईतील बोरा बाजार, एसबीयूटी क्षेत्र, सरदार वल्लभभाई पटेल रोड आणि पाकमोडिया मार्ग परिसरात गुरुवारी पहाटेचा पाणीपुरवठा बंद

‘ई’ विभाग : माझगाव कोळीवाडा, डॉकयार्ड रोड, काळाचौकी आणि घोडपदेव परिसरात बुधवारी, तर मदनपुरा, नागपाडा, आग्रीपाडा आणि भायखळा परिसरात गुरुवारी कमी दाबाने पाणी. जेजे, नायर आणि कस्तुरबा रुग्णालयास कमी दाबाने पाणीपुरवठा

‘एफ-दक्षिण’ विभाग : शिवडी, वडाळा आणि अभ्युदयनगर भागात गुरुवारी पाणी बंद. परळ, लालबाग, हिंदमाता आणि दादर परिसरात गुरुवारी कमी दाबाने पाणीपुवरठा.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें