घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

वाईत भव्य नागरी सत्काराची जय्यत तयारी; मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा रंगणार ( वाई प्रतिनिधी प्रशांत थोरवे )

वाई : भारतीय जनता पार्टी, वाई–खंडाळा–महाबळेश्वर विधानसभा क्षेत्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “भव्य नागरी सत्कार” सोहळा येत्या रविवार, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी वाई येथे उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्यात वाई नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व सदस्य तसेच पंचायत समिती सदस्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य) तसेच जयकुमार गोरे (ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे अनेक मान्यवर नेतेही उपस्थित राहणार आहेत.
सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी वाई नगरपालिकेच्या सभागृहात प्रमुख कार्यकर्त्यांची पूर्वतयारी बैठक पार पडली. या बैठकीत वाई नगरीचे नूतन नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पुढील काळात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकासकामांना अधिक गती दिली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी कार्यकर्त्यांना संघटितपणे काम करण्याचे आवाहन करत, या भव्य सोहळ्याच्या माध्यमातून सर्वांना नवचैतन्य व उभारी मिळेल, असेही नमूद केले. यावेळी पंचायत समिती सदस्य स्वप्नील गायकवाड, दिपक ननावरे, विजयसिंह पिसाळ, विजय ढेकाणे यांनीही मार्गदर्शन केले.
या भव्य नागरी सत्काराच्या माध्यमातून वाई तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असून कार्यकर्त्यांमध्ये नवीन स्फूर्ती निर्माण होणार आहे. तसेच या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विविध विकासकामांच्या घोषणांची शक्यता असल्याने या सोहळ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, हा सोहळा यशस्वी करण्यासाठी वाई तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठका घेण्याचे ठरविण्यात आले असून, स्थानिक पातळीवर नियोजन आणि जनसंपर्काला वेग देण्यात येत आहे. सर्व स्तरांवर कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत असून, हा भव्य सोहळा निश्चितच यशस्वी होईल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें