प्रतिनिधी – अमर शिवाजी पठारे
पुणे शहरातील वडगाव शेरी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिस चौकीत तीन तरुणांनी गोंधळ घालत स्वतःलाच जखमी केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशनगर चौकात दोन गटांमध्ये वाद झाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असता, काही तरुणांनी आक्रमक वर्तन करत पोलिसांनाच गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.
या घटनेत एका पोलिस कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून अतिरिक्त पोलिस फौज तातडीने घटनास्थळी दाखल करण्यात आली.
त्यानंतर संबंधित तिन्ही तरुणांना ताब्यात घेऊन पोलिस चौकीत आणण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.











