घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

वाईत भव्य नागरी सत्कार; मंत्री जयकुमार गोरे यांचा विरोधकांना इशारा, विकासावर ठाम भूमिका

( वाई प्रतिनिधी प्रशांत थोरवे )

वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित लोकप्रतिनिधींचा भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात पार पडताच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. भाजी मंडई, गणपती आळी येथे झालेल्या या सोहळ्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आक्रमक आणि रोखठोक शैलीत विरोधकांवर निशाणा साधत कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला. “मी इथे कोणाची जिरवायला आलो नाही, तर आमच्या कार्यकर्त्यांना बळ द्यायला आलो आहे,” अशा ठाम शब्दांत भाषणाची सुरुवात करत त्यांनी स्पष्ट इशारा दिला—“कोणाच्याही नादाला लागू नका; पण आपल्या नादाला लागलात तर आम्ही सोडत नाही. सावज टप्यात आलं की कार्यक्रम करतोच.” त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘विराज प्रकरणा’चा उल्लेख करत त्यांनी विरोधकांना थेट आव्हान देत “विराजच्या केसाला धक्का लावून दाखवा,” असे ठणकावले. या सोहळ्यास माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार मदनदादा भोसले, जि. प. अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव गायकवाड, कृषी भूषण शशिकांत पिसाळ, माजी जि. प. अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, डॉ. नितीन सावंत, नितीन भरगुडे-पाटील, आनंदराव शेळके, अनुप सूर्यवंशी तसेच नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्यासह सातारा जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

नामदार गोरे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा ‘सोयीस्कर वापर’ होत असल्याची टीका करत त्यांनी विरोधकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्वतःच्या संघर्षाचा दाखला देताना “२२ केसेस अंगावर घेत मी इथपर्यंत आलो आहे,” असे सांगत त्यांनी अटक, जिल्हाबंदी आणि राजकीय कटकारस्थानांचा उल्लेख केला. “शेतकऱ्यांच्या पोरांना मान-सन्मान नाही का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सामाजिक प्रश्नही अधोरेखित केले. “जे पेरलं ते उगवणारच,” असा इशारा देत त्यांनी भाषणाची सांगता केली. यावेळी मदनदादा भोसले यांनी कार्यकर्त्यांच्या एकजुटीवर भर देत विकासकामांतील अडथळ्यांवर टीका केली. महाबळेश्वर तालुक्यातील सुमारे १० हजार कोटींच्या हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पामुळे रोजगारनिर्मितीला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धोम धरणावर ‘वॉटर प्लेन’ प्रकल्प राबवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कृषी भूषण शशिकांत पिसाळ यांनी संयमाचा संदेश देत विकासप्रधान राजकारणावर भर देण्याचे आवाहन केले. नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी वाई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाणीपुरवठा, भुयारी गटार योजना, नदी संवर्धन, बाजारपेठ विकास आणि पर्यटनवृद्धी यांसारख्या प्रकल्पांचा रोडमॅप मांडला. “वाईला ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळख निर्माण करून पर्यटन नकाशावर ठळक स्थान मिळवून देणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “शहराच्या विकासात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. रखडलेली कामे पूर्ण करून वाईचा चेहरामोहरा बदलणार,” असे ते ठामपणे ते म्हणाले. “नागरिकांना मूलभूत सुविधा देणे ही आमची जबाबदारी असून, येत्या काळात वाई शहर विकासाच्या बाबतीत आदर्श ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, “तमाम वाईकरांनी मला भरघोस मतांनी निवडून जो विश्वास दिला आहे, त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही,” अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “आपण वाई शहराचा विकास करण्यासाठी कटीबद्ध आहोत. या विकासासाठी सदैव नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या पाठीशी उभे असू.” या सोहळ्यात विविध पदाधिकाऱ्यांचा मंत्री गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी युवा नेते विराज शिंदे यांनी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला. वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यातील नागरिक, महिला, युवक व भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत हा सोहळा खऱ्या अर्थाने यशस्वी केला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें