वाई :- : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून सर्वोद्रय सेवा ट्रस्ट, वाई यांच्या वतीने “गर्जा महाराष्ट्र माझा २०२६” या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक १ मे रोजी सायंकाळी ५ वाजता जुनी महात्मा फुले भाजी मंडई, वाई येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणांसह सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा गुणगौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमात गाथा महाराष्ट्राची या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते प्रा. दशर्थ सिरसाट (मुंबई) यांचे विशेष व्याख्यान होणार आहे.
कार्यक्रमाला मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून,राज्यसभा खासदार नितीन पाटील, वाईचे नूतन नगराध्यक्ष अनिल सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी , पंचायत समिती सभापती विक्रांत डोंगरे, पंचायत समिती उपसभापती सौ. वर्षाताई जगताप,पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, जि. प सदस्य लोकनेते बापूसाहेब शिंदे,समाजसेवक बाळासाहेब चिरगुटे, भगवानराव फणसे तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमाचे आयोजन सर्वोद्रय सेवा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले असून अध्यक्ष संजय जेधे -देशमुख, सचिव संतोष वाडकर, उपाध्यक्ष प्रकाश वाडेकर, खजिनदार ज्ञानदेव वाशिवले यांच्यासह सर्व संचालक सदस्यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.
तसेच ‘सर्वोदय सेवा गौरव पुरस्कार’ देऊन विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जीवन विद्या मिशन व ज्ञान साधना केंद्र यांचे सहकार्य लाभले आहे.
कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.











