घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

शिर्डीत युवा क्रांती फाउंडेशनचा ४था वर्धापन दिन; महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासह भव्य आयोजन

शिर्डी प्रतिनिधी – अमर शिवाजी पठारे
युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलिस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांचा ४था वर्धापन दिन येत्या 21 मे 2026 रोजी शिर्डी येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025-26 सोहळ्याचेही भव्य आयोजन करण्यात आले आहे.
संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यात उत्तम संघटन कौशल्य दाखवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार असून, मुंबई महिला अध्यक्षा सौ. स्मिता बांद्रेकर यांना महाराष्ट्र महिला घटकातून क्रमांक 2 चा मानकरी म्हणून गौरविण्यात येणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
कार्यक्रमात सामाजिक, पत्रकारिता, ग्राहक हक्क आणि माहिती अधिकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विशेष सन्मान देण्यात येणार आहे. तसेच विविध मार्गदर्शनपर भाषणे, सन्मान सोहळा आणि संघटनेच्या कार्याचा आढावा घेणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
“चला शिर्डी” या घोषवाक्यासह वर्धापन दिन व पुरस्कार सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, हा सोहळा भव्य आणि संस्मरणीय ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें