घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कमंडलू माध्यमिक आसरे विद्यालयातील कर्मचारी संतोष डगळे यांना “आदर्श समाजभूषण प्रेरणा गौरव पुरस्कार २०२६” (वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे)

रोहिडेश्वर शिक्षण संस्था संचलित कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय, आसरे (ता. वाई) येथील कर्तव्यदक्ष कर्मचारी श्री. संतोष डगळे यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत, सप्रेम नमस्कार विकास मंच, वाई तसेच कलाकार चित्रकार संघ, सातारा यांच्या वतीने त्यांना “आदर्श समाजभूषण प्रेरणा गौरव पुरस्कार २०२६” या मानाच्या व प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या गौरव सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून वाई अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन डॉ. शेखर कांबळे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून पुणे येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर आपटे तसेच हेमंतकुमार जाधव यांनी उपस्थिती दर्शविली.
तसेच शिरूरचे तहसीलदार दिलीप जाधव, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक कृष्णा कांबळे, सातारा जिल्हा आरपीआय उपाध्यक्ष सागर (भाऊ) शिंदे, कलाकार चित्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष जयसिंगराव पवार, संस्थापक संजय सकटे, अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप जाधव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
श्री. संतोष डगळे यांच्या संकल्पनेतून आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच शिक्षकवृंदाच्या सहकार्याने “एक हात मदतीचा” हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत “विद्यार्थी दत्तक पालक योजना” सुरू करून अनाथ, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आधार देण्याचे कार्य केले जात आहे.
विश्वरूप वारकरी शिक्षण संस्था, रेणावळे येथे अध्यात्मिक व शैक्षणिक शिक्षणासाठी येणाऱ्या विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे.
या उपक्रमामुळे अनेक दानशूर व्यक्तींनी विद्यार्थ्यांना दत्तक घेतले असून, डगळे यांच्या पारदर्शक कार्यपद्धतीमुळे समाजातील दानशूर व्यक्ती, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि विविध सामाजिक संस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामधून उभ्या राहिलेल्या निधीतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश, क्रीडावेश व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे पवित्र कार्य घडत आहे.
या कार्यासाठी रोहिडेश्वर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी यांची भक्कम साथ लाभत आहे. श्री. डगळे यांचे मूळ गाव पिंगळवाडी (नारोडी), ता. आंबेगाव, जि. पुणे असून तेथेही ते ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या कार्यात त्यांच्या पत्नी, माजी जिल्हा परिषद सदस्य रंजनाताई डगळे यांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे.
या पुरस्कारामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाची भावना निर्माण झाली असून, श्री. संतोष डगळे यांच्या पुढील कार्यासाठी सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें