घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

नाशिकमध्ये हुंडाबळीची धक्कादायक घटना; विवाहितेने संपवले आयुष्य

प्रतिनिधी : अमर शिवाजी पठारे

नाशिकच्या जेलरोड परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली असून, सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विवाहितेच्या सासरकडून फ्लॅट आणि चारचाकीसाठी तब्बल २५ लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. पीडित महिलेच्या भावाने बहिणीचा संसार टिकावा म्हणून आईच्या नावावरील जमीन विकून पैसे दिले, तसेच लग्नात २१ तोळे सोनंही देण्यात आलं होतं. मात्र, एवढं करूनही विवाहितेला सासरी प्रेमाऐवजी अपमान, त्रास आणि धमक्यांचा सामना करावा लागत होता.

तक्रारीनुसार, पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यामुळे संबंधित विवाहितेला वारंवार मानसिक त्रास सहन करावा लागत होता. अखेर या सर्व त्रासाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे प्रभावीपणे राबवण्याची माग

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें