घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

गणेशा अल्टरनेटिव्ह थेरेपी सेंटरला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निसर्गोपचार व आयुर्वेदिक उपचारपद्धतीमुळे रुग्णांना मिळतोय दिलासा (वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे)

आरोग्य क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण उपचारपद्धतीमुळे ओळख निर्माण केलेल्या व्याहळी कॉलनी येथील गणेशा अल्टरनेटिव्ह थेरेपी सेंटरला रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. खंडाळा, फलटण, कोरेगाव, भोर, सातारा, वाई, मेढा आदी तालुक्यांतून अनेक रुग्ण उपचारासाठी येथे नियमित येत असून त्यांना चांगला लाभ होत असल्याचे दिसून येत आहे.
या सेंटरमध्ये मॉडर्न सायन्सच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचे पेन किलर न देता केवळ आयुर्वेदिक फॉर्म्युले, निसर्गोपचार आणि विविध थेरेपींच्या माध्यमातून उपचार केले जातात. आजाराच्या मुळाशी पोहोचून रुग्णाला दीर्घकालीन आराम मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.
विशेषतः शरीरातील वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन राखण्यावर भर दिला जातो. शरीराच्या नैसर्गिक कार्यपद्धतीला चालना देत रुग्णांना योग्य तो आराम मिळावा यासाठी वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन आणि उपचार केले जातात. त्यामुळे अनेक जुनाट व्याधींमध्येही रुग्णांना सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळत आहेत.
मुळव्याध आणि मुतखडा या आजारांवर ७०० पेक्षा जास्त रुग्णांना व्याधीमुक्त करण्यात वैद्य यशस्वी ठरले आहेत. तसेच सांधेदुखी, पाठदुखी, नसांचे विकार व इतर अनेक शारीरिक तक्रारींवर येथे पर्यायी उपचारपद्धतीद्वारे सेवा दिली जाते. अनुभवी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार होत असल्याने रुग्णांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
येथे रुग्णांना सेवा देणारे पारंपारिक वैद्य गणेश लक्ष्मण कुंभार हे भारत सरकारच्या VCSTCHP योजनेअंतर्गत प्रमाणित असून त्यांना या क्षेत्रातील तब्बल दहा वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्या उपचारपद्धतीचा लाभ अनेक रुग्णांनी घेतला असून समाधान व्यक्त केले आहे.
त्याशिवाय येथे हेड मसाज, बॉडी मसाज, पादाभ्यंग मसाज, पोटली मसाज तसेच विविध प्रकारचे उपचारात्मक मसाजही केले जातात. शरीरातील ताणतणाव कमी करून आरोग्य सुधारण्यासाठी या उपचारपद्धतींचा प्रभावी उपयोग होत असल्याचे सांगितले जाते.
रुग्णांशी आत्मीयतेने संवाद साधणे, त्यांच्या समस्येचे बारकाईने निरीक्षण करणे आणि कमी खर्चात प्रभावी उपचार उपलब्ध करून देणे ही या सेंटरची विशेष ओळख बनली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी गणेशा अल्टरनेटिव्ह थेरेपी सेंटर आशेचा किरण ठरत आहे.
संपर्क :
पारंपारिक वैद्य गणेश लक्ष्मण कुंभार
📞 ८३९०३१५५९५ / ७०६६९१५३७६
📍 व्याहळी कॉलनी, वाई.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें