घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

संघर्ष दिव्यांग संस्थेकडून दहावीच्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक खर्च स्वीकार ऋषिकेश बांदल याला शालेय साहित्याचे वाटप; शिक्षणासाठी संस्थेचा मदतीचा हात(वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे)

दिनांक ११ मे २०२६ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संघर्ष दिव्यांग संस्थेच्या वतीने इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या ऋषिकेश संदीप बांदल या विद्यार्थ्याला एका वर्षासाठी दत्तक घेऊन त्याच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारण्यात आली. यानिमित्ताने विद्यार्थ्याला शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
ऋषिकेश बांदल याची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्याचे वडील संदीप बांदल हे दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी ते अथक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या जिद्दीला आणि संघर्षाला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सलाम व्यक्त केला.
या कार्यक्रमास संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक, युवा नेते स्वप्निलभाई गायकवाड, पंचायत समिती सदस्य, वाई अर्बन बँकेचे उपाध्यक्ष डॉ. शेखर कांबळे, संस्थेचे जिल्हाध्यक्ष बाजीगरभाई इनामदार, वाई तालुका अध्यक्ष अजितकुमार जायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ऋषिकेशचे वडील संदीप बांदल यांनी संघर्ष दिव्यांग संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले. संस्थेच्या या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मोठा आधार मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या उपक्रमाचे आयोजन पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष संघर्ष दिव्यांग संस्था आणि संस्थापक अध्यक्ष अशोक बापू गायकवाड (रिपाई आठवले गट) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें