घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

दिशा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य ताजुद्दीन सय्यद यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट प्रिन्सिपल’पुरस्कार. शैक्षणिक नेतृत्व व नाविन्यपूर्ण उपक्रमांची राज्यस्तरावर दखल

वाई, दि. १ : दिशा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य ताजुद्दीन सय्यद सर यांना इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन, कोल्हापूर (EMSA) यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘बेस्ट प्रिन्सिपल’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक नेतृत्वाची, विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोनाची आणि संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली.
ताजुद्दीन सय्यद गेली ३२ वर्षे शिक्षण क्षेत्रात अविरतपणे कार्यरत असून, विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत. सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविणे हेच त्यांच्या शैक्षणिक कार्याचे प्रमुख ध्येय आहे. दिशा पब्लिक स्कूलमध्ये गेली १५ वर्षे ते प्राचार्य म्हणून डॉ. नितीन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला आणि विविध कौशल्यांना वाव मिळावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवातून सय्यद सर यांनी संस्थेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्यांनी बालभारतीसाठीही कार्य केले असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासक्रमासोबत विविध उपक्रमांना महत्त्व दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून देश-विदेशात विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.

सय्यद सर यांच्या सन्मानाबद्दल सुमन एज्युकेशन सोसायटीचे दिशा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे चेअरमन डॉ नितीन कदम सर व सचिव प्रा रूपाली कदम मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

दिशा पब्लिक स्कूल ही सातारा जिल्ह्यातील नामांकित इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणून ओळखली जाते. शाळेने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांना वाव देण्यासाठी सातत्याने उपक्रम राबविले आहेत. येथील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक तसेच सहशालेय क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून राज्यभर आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने निर्माण केलेले शैक्षणिक वातावरण आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे शाळेची शैक्षणिक वाटचाल सातत्याने पुढे जात आहे.

कोल्हापूर येथील हॉटेल सयाजी येथे झालेल्या राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळ्यात कोल्हापूरचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सय्यद यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातील विविध जिल्ह्यांतून प्राप्त प्रस्तावांची छाननी व मूल्यांकनानंतर निवड झालेल्या १५ मुख्याध्यापकांमध्ये सय्यद यांची निवड झाली.

यावेळी EMSAचे अध्यक्ष के. डी. पाटील, संस्थापक अध्यक्ष महेश पोळ, राज्याध्यक्ष गणेश नायकुडे, उपाध्यक्ष संजय जाधव, सचिव नितीन पाटील, सहसचिव विल्सन वास्कर, कोल्हापूर शहर अध्यक्ष अमर सरनाईक, क्रीडा प्रमुख सचिन नाईक, राधानगरी तालुका प्रमुख दत्तात्रय रणदिवे, विद्यावर्धिनी संस्थेचे विश्वस्त तथा ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर, अमोल बोडके यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रा.डॉ. नितीन कदम म्हणाले, “ ताजुद्दीन सय्यद यांनी संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करताना अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासाला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. शिक्षकांना सोबत घेऊन केलेले त्यांचे कार्य आणि शाळेच्या प्रगतीसाठीची त्यांची धडपड कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर झालेली दखल ही दिशा अकॅडमीसाठी अभिमानाची बाब आहे.”

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें