९४ टक्क्यांपर्यंत गुण मिळवत विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली
पुणे | प्रतिनिधी.
पुण्यातील एकलव्य अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी युनिट टेस्ट २०२६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विविध शाळांमध्ये झालेल्या या परीक्षेत विद्यार्थ्यांनी तब्बल ९४ टक्क्यांपर्यंत गुण मिळवले आहेत.
या यशामध्ये श्रीय्या कर्डेकर, सिद्धी वायभासे आणि आस्था पांडे यांनी प्रत्येकी ९४ टक्के गुण मिळवत विशेष कामगिरी केली. तर संस्कृती नलावडे यांनी ९० टक्के, वैदही साळुंखे यांनी ८९.१७ टक्के आणि आदित्यराज खाटपे यांनी ८६ टक्के गुण मिळवले.
याशिवाय सोहम तुंगतकर आणि सिद्धी शिलिमकर यांनी प्रत्येकी ८५ टक्के, सार्थक चव्हाण यांनी ८३.७५ टक्के, आर्यन ठाकूर यांनी ८३ टक्के, तर श्रेया रेणुसे यांनी ८२.५० टक्के गुण मिळवत यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे नियमित अभ्यास, संकल्पनांची स्पष्ट समज, सातत्यपूर्ण सराव आणि शिक्षकांचे वैयक्तिक मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे. या यशामध्ये ऋषिकेश थोरवे सर, श्रावणी ठाकूर, सानिका मुजुमले यांच्यासह ओंकार शिवतरे, गुरुप्रसाद कोठावळे, गौरी मोरे, अभिषेक पासलकर, मयुरी क्षीरसागर, श्रुती कवचाळे आणि उत्कर्ष अतुलिया या शिक्षकवृंदाचे मोलाचे योगदान आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या एकलव्य अकॅडमीच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन करण्यात आले.
‘प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती हीच आमची खरी ओळख’ या ध्येयाने कार्यरत असलेल्या एकलव्य अकॅडमीच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.10:43 AM











