वाई प्रतिनिधी
वाई, दि. १ फेब्रुवारी : उत्कर्षनगर व परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यशवंतनगर जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार लोकनेते दिनकर (बापूसाहेब) महादेव शिंदे तसेच पंचायत समिती गणाचे उमेदवार संजय भिकू कांबळे यांच्या प्रचारार्थ उत्कर्षनगर व परिसरात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम भागाचे युवा नेते प्रवीण शिंदे, आबा डोंगरे, बाळकृष्ण तरडे सर यांच्यासह वाई नगरपालिकेचे नूतन नगरसेवक सनी चव्हाण, उमेश जायगुडे, युगल घाडगे, मयूर खरात, बापूराव खरात आदी मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उत्कर्षनगरचे रहिवासी डॉ. अर्जुन जाधव, विलास वाडकर, विजय चौधरी, बापू चौधरी, माळवदे सर, लावंड सर तसेच तामजाई नगर, रेशीम केंद्र व किसनवीर कॉलेज परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

प्रचारादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना पश्चिम भागाचे युवा नेते प्रवीण शिंदे यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणारा पक्ष आहे. लोकनेते बापूसाहेब शिंदे यांच्या माध्यमातून पश्चिम भागात सातत्याने विकासाची घडी बसली असून, उत्कर्षनगरसह संपूर्ण पश्चिम भागाचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय आहे.” यावेळी पंचायत समिती गणाचे उमेदवार संजय भिकू कांबळे यांनी नागरिकांशी संवाद साधत, या भागातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत आपण नेहमीच सकारात्मक भूमिका घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उत्कर्षनगर परिसरातील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन यांसारखी अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली असून, आगामी काळात कॅनॉल रस्त्याचे काम, स्ट्रीट लाईट तसेच भूमिगत गटार व्यवस्था आदी विकासकामे जननायक नामदार मकरंद आबा पाटील व राज्यसभेचे खासदार नितीन काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केली जातील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. या प्रचार फेरीमुळे उत्कर्षनगर व परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.











