घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सिंहगडावर ऐतिहासिक कोळीवाड्यांत स्वच्छता मोहीम; गड किल्ले संवर्धन संस्थेचा पुढाकार

पुणे प्रतिनिधी : शांताराम लांघे

शत्रूच्या तावडीतून किल्ले सिंहगड जिंकताना आपल्या पराक्रमाची अमर साक्ष देत स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणारे नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास जपण्याच्या उद्देशाने गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य – सिंहगड विभाग यांच्या वतीने सिंहगड परिसरात व्यापक साफसफाई व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.नरवीर तानाजी मालुसरे यांनी सिंहगड जिंकण्यापूर्वी ज्या ठिकाणी येऊन जागरण-गोंधळ घालून किल्ल्याची माहिती मिळवली, त्या ऐतिहासिक शूरवीर खंडोजी नाईक, घेरे सरनाईक (जोरकर) यांच्या कोळीवाड्याची तसेच परिसराची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत अमृतेश्वर मंदिरास रंगरंगोटी करून मंदिर परिसर आणि आजूबाजूचा भाग स्वच्छ करण्यात आला. वाढलेली झुडपे, छोटी झाडे तोडून परिसर मोकळा करण्यात आला.तसेच, परिसरातील जुन्या ऐतिहासिक वीरांच्या वीरगळांच्या आजूबाजूचे गवत काढून त्यांचे संवर्धन करण्यात आले. संस्थेच्या वतीने कोळीवाड्यांची सविस्तर माहिती देणारे फलक बसवण्यात आले. याचबरोबर कळकीचे मेट या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करणारे माहिती फलक अमृतेश्वर मेट आणि कळकीचे मेट येथे लावण्यात आले.ही स्वच्छता मोहीम दरवर्षी ऐतिहासिक अष्टमी जागरण व गोंधळाच्या आठ दिवस आधी राबविण्यात येते, अशी माहिती गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्यचे संस्थापक साईनाथ जोशी यांनी दिली.या मोहिमेत संस्थेचे शांताराम लांघे, शुभम रानम, दत्ता जोरकर, मोसीम मुल्ला, जीवन बराटे, सौरभ शिंदे, अविनाश गायकवाड, विशाल मोरे, सुमित शेंडगे, आदित्य रनवरे, महिला विभाग प्रमुख मंजिरी मुल्ला, मेरी मुल्ला यांच्यासह घेरा सिंहगडचे माजी सरपंच दत्तात्रय जोरकर, भानुदास जोरकर, राहुल जोरकर, सत्यवान जोरकर, पोपट लांघे व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.याशिवाय मा. पंचायत समिती सदस्य दत्ताभाऊ जोरकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. या संपूर्ण मोहिमेत १९ दुर्ग सैनिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.सिंहगडाच्या वैभवशाली इतिहासाचे जतन आणि भावी पिढ्यांपर्यंत तो पोहोचवण्याच्या दृष्टीने ही मोहीम प्रेरणादायी ठरत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें