घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*पोलीसांची धाड अन् मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

पिंपरी चिंचवड शहरातील अवैध वेश्याव्यवसाय आणि मानवी तस्करीचे प्रकार सर्रास पुणे सुरू होते. याला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने मोठी कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सार्वजनिक ठिकाणी अवैध कृत्य चालणाऱ्या 3 आस्थापनांना 1 वर्षासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

या कारवाईत पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या. इथं स्पा आणि लॉजच्या नावाखाली नको ते धंदे केले जात होते. पोलीसांनी या धाडीत सर्वांना रंगेहात पकडले आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे निलख येथील इंटर्नल फॅमिली स्पा वर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा टाकला. या कारवाईत 4 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. मूळचा आसामचा असलेला स्पा मॅनेजर अब्दुल मोहमद हुसेन कलाम याला अटक करण्यात आली आहे. जानेवारी 2026 मध्ये ज्या ठिकाणी अवैध व्यवसाय आढळला होता. अशा 3 आस्थापनांना पोलीस आयुक्तांनी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यात निक्की लॉज (चिंचवड), लेमन ग्रास थाई स्पा (काळेवाडी), औरा थाई स्पा (सांगवी) यांचा समावेश आहे.

जानेवारी २०२६ मध्ये निगडीतील ईगल स्पा, कृष्णा लॉज आणि आळंदीतील योगीराज लॉजवर छापे टाकून महिलांची सुटका करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने 2025 या वर्षात एकूण 28 ठिकाणी छापे टाकले होते. त्यात 8 स्पा, 7 हॉटेल, 3 फ्लॅट आणि 10 ऑनलाईन छापे टाकून 45 आरोपींना अटक करण्यात आली होती. तसेच 63 महिलांची सुटका केली होती. सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या 107 महिलांवर 70 गुन्हे देखील नोंदवण्यात आले आहेत. त्यातून अशा घटनांना पायबंद घालण्याचा पोलीसांचा प्रयत्न होता.

ही धडक कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह-आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईनंतर तरी शहरातल्या अशा अवैध व्यवसायांना आळा बसेल अशी अपेक्षा शहरातील नागरिक करत आहेत. आता कारवाई होते पण काही दिवसांनी पून्हा हे धंदे सुरू होतात असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे या कारवाईनंतर तरी ही अवैध धंदे पूर्ण पणे बंद होणार आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें