घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*अनोळखी व्यक्तीने आईवरून शिवी दिली, संतापलेल्या तरुणाने दगडाने ठेचून संपवले

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. एका अत्यंत क्षुल्लक आणि धक्कादायक कारणावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना तळेगाव दाभाडे परिसरात घडली आहे.केवळ आईवरून शिवी दिली, या रागाच्या भरात एका तरुणाने दुसऱ्याचा दगडाने ठेचून खून केला.

या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मैदानावर क्रिकेट पाहताना सुरू झाला वादसमोर आलेल्या माहितीनुसार, मयत संतोष पवार आणि आरोपी सनी चव्हाण हे दोघेही सोमाटणे फाटा येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या मैदानात क्रिकेटचा सामना पाहत होते. विशेष म्हणजे हे दोघेही एकमेकांसाठी पूर्णपणे अनोळखी होते.

एकाच कट्ट्यावर बसून सामना पाहत असताना त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून किरकोळ बाचाबाची झाली.दगडाने डोके ठेचून केली हत्याया वादादरम्यान मयत संतोष पवार याने आरोपी सनी चव्हाण याला आईवरून शिवीगाळ केली. ही शिवी सनीच्या जिव्हारी लागली आणि त्याचा रागावरील ताबा सुटला. संतापलेल्या सनीने तिथेच पडलेला एक मोठा दगड उचलला आणि संतोषच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. हा घाव इतका भीषण होता की संतोषचा जागीच मृत्यू झाला.

सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास ही घटना घडल्याने मैदानात एकच पळापळ झाली.पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्याघटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

अवघ्या काही वेळातच पोलिसांनी आरोपी सनी चव्हाण याला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. “केवळ शिवीगाळ केल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली.नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरणया घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

तरुणांमध्ये संयमाचा अभाव आणि वाढत्या रागामुळे अशा छोट्या कारणावरून हत्या होणे, ही गंभीर बाब असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे. सध्या तळेगाव दाभाडे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें