घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यातील वाहन चालकांमध्ये तीव्र असंतोष

पुणे प्रतिनिधी
दि. ३ फेब्रुवारी २०२६ पासून पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वाहन योग्यता (Fitness Certificate) तपासणीसाठी वापरण्यात येणारे ऑनलाईन पोर्टल कोणतीही पूर्वसूचना, कोणतीही प्रेस नोट किंवा वाहन चालक संघटनांना पूर्वकल्पना न देता अचानकपणे बंद करण्यात आले आहे.
याबाबत आझाद रिक्षा चालक संघटनेतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच परिवहन आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निर्णयामुळे पुण्यातील हजारो वाहन चालकांना त्यांच्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट मिळविण्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणे पूर्णतः अशक्य झाले असून वाहनचालकांमध्ये तीव्र संभ्रम व असंतोष निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार भविष्यात सर्व वाहनांची फिटनेस तपासणी Automated Testing Station (ATS) द्वारे करण्यात येणार आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात ATS अद्याप प्रत्यक्ष कार्यान्वित न होता आधीच फिटनेस पोर्टल बंद करण्यात आल्यामुळे वाहन चालक अडचणीत सापडले आहेत.


यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. संघटनेतर्फे याबाबत अधिक माहिती देताना संस्थापक अध्यक्ष शफिक भाई पटेल म्हणाले की योग्यता प्रमाणपत्र नसलेले वाहन रस्त्यावर चालू असताना एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?
१५ वर्षे पूर्ण झालेल्या वाहनांवर दररोज ₹५०/- प्रमाणे अतिरिक्त दंड आकारला जाणार असताना, प्रशासनाकडूनच फिटनेस तपासणीची सुविधा उपलब्ध नसल्यास हा दंड वाहन चालकांनी का भरावा?
तसेच फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या वाहनाचा अपघात किंवा वाहन चोरी झाल्यास विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई नाकारली गेल्यास त्याची जबाबदारी कोणाची राहणार, हा प्रश्नही गंभीर आहे.
वाहन चालकांचा यामध्ये कोणताही दोष नसताना प्रशासनाच्या नियोजनशून्य निर्णयाचा फटका वाहन चालकांना बसत आहे, अशी तीव्र भावना शफिक भाई पटेल यांनी व्यक्त केली आहे.
आझाद रिक्षा चालक संघटनेकडून अशी मागणी करण्यात येत आहे की,
ATS प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत फिटनेस सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन पोर्टल त्वरित सुरू करावे किंवा ऑफलाईन पद्धतीने वाहन तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र देण्याची तातडीची व्यवस्था करावी.


तोपर्यंत वाहन चालकांवर कोणताही दंड लावू नये, अशीही स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास याचे गंभीर कायदेशीर व सामाजिक परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही वाहन चालक संघटनांकडून देण्यात आला आहे.

शफिक भाई पटेल
संस्थापक अध्यक्ष
आझाद रिक्षा चालक संघटना
संपर्क : 9850494189

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें