घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*बारावीच्‍या विद्यार्थ्याची भोसरीत आत्महत्या

अभ्यासाचा ताण आणि परीक्षेच्या दडपणातून बारावीच्‍या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. शुक्रवारी (ता. ६) दुपारी भोसरीतील संत तुकारामनगर परिसरात हा प्रकार घडला.

प्रणय सुनील खैरे (वय १७) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो भोसरीतील राजमाता जिजाऊ महाविद्यालयात विज्ञान शाखेत बारावीमध्ये शिकत होता.

कनिष्ठ महाविद्यालयामधील प्रकल्प अपूर्ण राहिल्याने तसेच प्रात्यक्षिक परीक्षा न दिल्यामुळे तो चिंतेत असल्याची माहिती मित्र व नातेवाइकांनी पोलिसांना दिली.

शुक्रवारी तो आईबरोबर महाविद्यालयात परिक्षेचे हॉल तिकीट आणण्यासाठी गेला होता. त्यानंतर आई बँकेत कामावर गेली. त्याचे वडील गावी गेले होते. घरात एकटा असताना त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते.

अधिक भोसरी पोलिस तपास करीत आहेत. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें