रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी चिंचवड स्थानकावर महत्त्वाच्या मेल एक्स्प्रेस गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी पुणे-मुंबई-पुणे रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर व ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखले जाते. या शहरातून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. असे असले तरीही चिंचवड स्थानकावर मेल एक्स्प्रेस गाड्यांना थांबा नाही.
परिणामी पिंपरी -चिंचवड शहरातील नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी पुणे अथवा लोणावळा स्थानक गाठावे लागते. यासाठी त्यांना दोन तास आधीच घर सोडावे लागते. यामुळे नागरिकांचे मोठे हाल होतात.
चिंचवड स्थानकावर योग्य त्या पायाभूत सुविधा आहेत.त्यामुळे येथे महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा दिल्यास प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रामुख्याने मुंबई व दक्षिण भारताकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी होत आहे.
या आहेत गाड्या गाडी क्रमांक रेल्वे
१२१२५/१२१२६ प्रगती
एक्स्प्रेस२२१०५/२२१०६ इंद्रायणी एक्स्प्रेस१७४११/१७४१२ महालक्ष्मी एक्स्प्रेस२२१०७/२२१०८ लातूर
एक्स्प्रेस२२१४३/२२१४४ बिदर
एक्स्प्रेस१२१६३/१२१६४ दादर-चेन्नई एक्स्प्रेस१७३१७/१७३१८ हुबळी एक्स्प्रेस












