घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*लोणावळ्यातील दरीत कोसळून मेहकरच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

प्रवासादरम्यान निसर्गरम्य ठिकाण पाहून क्षणभर थांबण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मात्र अशाच एका थांब्याने एका कुटुंबावर काळाचा घाला घातल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील तरुणाचा लोणावळ्यातील दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.मेहकर येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत गिरी यांचा २६ वर्षीय एकुलता एक पुत्र प्रज्वल वसंत गिरी याचा शनिवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी लोणावळा परिसरातील दरीत पडून मृत्यू झाला.

प्रज्वल हा पुणे येथे बी.एड.चे शिक्षण घेत होता. त्याचबरोबर तो एमपीएससी परीक्षेचीही तयारी करत होता.८ फेब्रुवारी रोजी प्रज्वल हा आपल्या नातेवाइकांसोबत कारने मुंबईहून पुण्याकडे निघाला होता.

प्रवासादरम्यान लोणावळा येथे अल्पोपहारासाठी सर्वजण थांबले. यावेळी प्रज्वल व त्याचा मावसभाऊ “थोडा वेळ टेकडीवर फेरफटका मारून येतो,” असे सांगून निघाले. मात्र हा फेरफटका प्रज्वलच्या जीवावर बेतला.टेकडी परिसरात फिरत असताना अचानक पाय घसरल्याने प्रज्वल खोल दरीत कोसळला. अपघात इतका गंभीर होता की त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.प्रज्वलचे वडील प्रा. वसंत गिरी हे मेहकर येथील एम.ई.एस.ओ. महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ या गाजलेल्या एकपात्री प्रयोगाचे त्यांनी राज्यभरात पाचशेहून अधिक प्रयोग सादर केले आहेत.

तसेच क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोगांचे हजाराहून अधिक प्रयोग त्यांनी केले असून त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत.एकुलत्या एक मुलाच्या अकस्मात मृत्यूमुळे गिरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच गिरी कुटुंबीय रात्री उशिरा पुण्याकडे रवाना झाले.

प्रज्वलच्या पार्थिवावर सोमवार, दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मेहकर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.या घटनेमुळे मेहकरसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रवासादरम्यान धोकादायक ठिकाणी फेरफटका मारताना खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें