घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

​पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी विक्रम खुटवड यांना संधी मिळावी; भोर-राजगड (वेल्हा) परिसरातून नागरिकांची जोरदार मागणी

​भोर प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रमदादा खुटवड आणि त्यांच्या पत्नी सौ. तृप्तीताई खुटवड यांनी मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी विक्रम खुटवड यांचे नाव अग्रक्रमाने चर्चेत आले आहे. विकासकामांचा प्रदीर्घ अनुभव आणि जनमानसातील पकड पाहता, त्यांना हे मानाचे पद मिळावे अशी भावना भोर, वेल्हा आणि राजगड परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
​नागरिकांचा ‘निःशब्द’ कौल आणि विश्वासाची पावती
​यावेळची निवडणूक खुटवड परिवारासाठी अत्यंत भावनिक आणि आव्हानात्मक होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाचा आघात आणि सत्तेत नसतानाही केलेला संघर्ष, अशा परिस्थितीत विक्रम खुटवड आणि तृप्तीताईंनी कसल्याही मोठ्या प्रचाराशिवाय केवळ केलेल्या कामाच्या जोरावर विजय मिळवला. मतदारांनी त्यांच्यावर दाखवलेला हा विश्वास त्यांच्या “जनसेवा” या ब्रीदवाक्याला मिळालेली मोठी पावती मानली जात आहे.
​राजकीय वारसा आणि कामाचा अनुभव
​खुटवड परिवाराला मोठा राजकीय वारसा लाभला आहे.
​स्व. काशिनाथराव खुटवड: १९९९ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी भोर-वेल्हा परिसरात विकासाची मोठी गंगा आणली होती. आजही या भागात त्यांच्या नावाने मते मागितली जातात, यातच त्यांच्या कार्याची पोचपावती मिळते.
​विक्रम खुटवड: महाविकास आघाडीच्या काळात जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून त्यांनी अनेक रखडलेली कामे मार्गी लावली. २००७ मध्ये पंचायत समितीचे उपसभापती असतानाही त्यांनी सामान्य नागरिकांशी आपली नाळ कायम ठेवली होती.
​सौ. तृप्तीताई खुटवड: २०१२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठा या मूलभूत गरजांवर विशेष भर दिला. ग्रामीण भागात आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही लोकांच्या स्मरणात आहेत.
​पक्षाच्या विस्तारासाठी अध्यक्षपदाची गरज
​भोर आणि वेल्हा (राजगड) या दुर्गम आणि डोंगराळ तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बळकटीकरण करण्यासाठी विक्रम खुटवड यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाची गरज असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
​”विक्रम दादांनी सत्तेत असो वा नसो, जनतेची कामे कधीच थांबवली नाहीत. त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्यास संपूर्ण जिल्ह्यात पक्षाचा विस्तार होईलच, पण प्रामुख्याने भोर-वेल्हा भागातील प्रलंबित विकासकामांना गती मिळेल,” असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
​खुटवड यांचे नाव आता जिल्हा पातळीवरील नेत्यांच्या विचाराधीन असून, पक्षश्रेष्ठी या जनभावनेचा सन्मान करणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें