घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*पुणे, साखरवाडीतून संशयित ताब्यात, तपासात धक्कादायक माहीती समाेर!

सुखेड (ता. खंडाळा) येथील विहिरीत आढळलेल्या मृतदेहाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून कळंबोली येथील चार जणांनी संगनमताने एकाचा गळा आवळून खून केला.

त्यानंतर त्याचा मृतदेह सुखेडमधील विहिरीत आणून टाकला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

सोमनाथ कल्याण बोबडे (वय ३०, रा. रोडपाली सेक्टर २०, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी बंडू बापू भिसे (वय ४९, रा. कळंबोली, मूळ रा. दुधेबावी, ता. फलटण), विजय पोपटराव पवार (वय ३६, रा. साखरवाडी मारकड मळा, ता. फलटण), किरण विकास गायकवाड (वय २७, मूळ रा. होळ, ता. फलटण, सध्या रा. पंचम सोसायटी, पुणे), श्रीनिवास ज्ञानेश्वर लोणे (वय २५, रा. चुरमापुरी, ता. अंबड, जि. जालना, हल्ली रा. धायरेश्वर संकुल रायकर मळा, धायरी पुणे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून कळंबोली येथील या चौघांनी संगनमताने सोमनाथ बोबडे याचा गळा आवळून खून केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे हातपाय बांधून मोटारीतून सुखेड (ता. खंडाळा) गावचे हद्दीतील आहिरे खिंड येथे चोपडे वस्तीजवळ आबा जयवंत चोपडे यांच्या विहिरीच्या काटावर आणून त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून देऊन त्याच अवस्थेत त्याला विहिरीत ढकलून दिला.

दरम्यान, सुखेड हद्दीत आहिरे खिंड येथील विहिरीत शुक्रवारी (ता. सहा) सकाळी एका अनोळखी युवकाचा मृतदेह लोणंद पोलिसांना मिळून आला होता. घटनास्थळी पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, फलटणचे पोलिस उपअधीक्षक विशाल खांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी भेट देऊन पाहणी केली.

तपासात सीसीटीव्ही फुटेजवरून संशयितांची मोटार निष्पन्न झाली. त्यानुसार मिळालेल्या माहितीवरून संशयितांना पुणे व साखरवाडी येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. कळंबोली येथील मुख्य संशयिताने त्याच्या साखरवाडी व पुणे येथील मित्रांच्या सहकार्याने संगनमताने हा खून करून खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली संशयितांनी पोलिसांना दिली.

कारवाईत पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, शिवाजी जायपत्रे, रोहित फार्णे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर, रोहित हेगडे, पोलिस उपनिरीक्षक विश्वनाथ संकपाळ यांच्यासह लोणंदचे अंमलदार विजय पिसाळ, विष्णू धुमाळ, नितीन भोसले, सतीश दडस, बापूराव मदने, अंकुश कोळेकर, अवधूत धुमाळ, अमोल जाधव यांनी सहभाग घेतला. उपनिरीक्षक रोहित मच्छिंद्र हेगडे यांनी फिर्याद दिली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें