घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*उपमहापौर परशुराम वाडेकर पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवशी सकाळी ६ पासून ॲक्शन मोडवर

(शशिकांत पाटोळे) : पुणे महानगरपालिकेतील नवनिर्वाचित उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच कामाला सुरुवात केली. ते पहिल्याच दिवसापासून सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

आज ते सकाळी सहा वाजताच आपल्या बोपोडी औंध वार्डामध्ये ॲक्शन मोड मध्ये येत त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या व नागरी सुविधा बाबतची माहिती घेतली.

या प्रभागातील निरीक्षणा दरम्यान उपमहापौर परशुराम वाडेकर मुंबई पुणे रोडवर असलेल्या आरोग्य कोठी, नाईक चाळ, भीम ज्योत नगर, सर्वे नंबर २६, पठाण चाळ, रेल्वे गेट, गांधीनगर, भोईटे चाळ आणि रेल्वे गेट नंबर २० या परिसरांना त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या.

प्रभागातील पाहणी दरम्यान औंध वार्ड ऑफिसचे अधिकारी, श्री. विजय नायकर (महापालिका सहायक आयुक्त), वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. विजय भोईर (डी. एस. आय.), स्थानिक मुकादम सोनम गायकवाड, सुपरवायझर पुरुषोत्तम कांबळे इत्यादी अधिकारी या दरम्यान उपस्थित होते.

या निरीक्षणा दरम्यान उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी स्थानिक पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, ड्रेनेज-सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते व स्ट्रीट लाईट संदर्भातील स्थानिक नागरिकांच्या समस्या व तक्रारी जाणून घेतल्या व लगेच संबंधित अधिकाऱ्यांना त्या-त्या कामासंदर्भात तत्काळ सूचना दिल्या व ते कामे मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी नागरिकांच्या समस्यांचे निवारण करणे हे आमचं पहिलं दायित्व असणार आहे व त्याला आम्ही प्रथम प्राधान्य देणार आहोत. असे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून सांगण्यात आले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें