घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कृषी उपसंचालकपदी निवड झालेल्या ओमकार पारटे यांचा वेलंग येथे सत्कार समारंभ

वाई प्रतिनिधी :प्रशांत थोरवे

वेलंग गावचे माजी विद्यार्थी ओमकार कालीदास पारटे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत कृषी उपसंचालक या प्रतिष्ठित पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गावात सर्वत्र अभिमान व आनंद व्यक्त होत असून, त्यांच्या सत्कारासाठी विशेष गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या शुक्रवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वेलंग (ता. वाई) येथे हा सत्कार सोहळा पार पडणार आहे. ग्रामस्थ मंडळ वेलंग, भैरवनाथ सेवा तरुण मंडळ वेलंग (मुंबई) तसेच माजी विद्यार्थी संघ वेलंग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून राज्यस्तरावर मानाचे स्थान मिळवणे ही गावासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. ओमकार पारटे यांच्या मेहनती, चिकाटी व जिद्दीमुळे आज त्यांनी हे यश संपादन केले असून, त्यांचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


या गुणगौरव समारंभास गावातील ग्रामस्थ, तरुण वर्ग, मंडळाचे कार्यकर्ते तसेच विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ओमकार पारटे यांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें