घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

किल्ले सिंहगड, कोळीवाडा, अमृतेश्वर मेट मंदिर उत्सव शिवकाळ जागा.

पुणे प्रतिनिधी : शांताराम लांघे

नर वीर, शुर वीरांचा,जागरण, गोंधळ,मानवंदना मोठ्या उत्साहाने ऐतिहासिक कोळीवाडा अमृतेश्वर मंदिर येथे साजरा करण्यात आला. किल्ले सिंहगड शौर्याचे, बलिदानाने प्रतिक आहे.अशा ऐतिहासिक किल्ले सिंहगड जिंकण्यासाठी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी अमृतेश्वर (भैरव) गोंधळ घातला,बेल भंडारा उधळून वचन दिले, व शुर वीर खंडोजी नाईक(जोरकर ) यांना वचन दिले व घेतले. यांनी गड जिंकण्यासाठी मोलाचे सहकार्य, मदतकार्य केले.अशा ऐतिहासिक पवित्र ठिकाणी शुर वीर खंडोजी नाईक,कोळीवाडा ( घेरे सरनाईक -जोरकर)अमृतेश्वर मंदिर येथे दरवर्षी सालाबादप्रमाणे यंदाही रुढी परंपरा नुसार ऐतिहासिक कोळीवाडा, अमृतेश्वर मेट येथे नर वीरांचा, शुर वीरांचा जागरण, गोंधळ उस्तोव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तेथील स्थानिक ग्रामस्थ तरूण मंडळी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य, संस्थापक साईनाथ जोशी यांनी कोळीवाडा , अमृतेश्वर मंदिर पुर्ण इतिहास माहिती फलकाचे पुजन करुन अनावरण शिवभक्त राजेन्द्र बेंद्रे , मोडी लिपी अभ्यासक अशोक सर पाटिल, शिवभक्त , शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. आजूबाजूच्या परिसरातील गावातील स्थानिक ग्रामस्थ उपस्थित राहिले होते. यांच्या सर्वांच्या उपस्थित शुर वीर ,नर वीरांना ठिक रात्री बारा वाजता बेल , भंडारा उधळण करुन मानवंदना देण्यात आली व हर हर महादेव,जय शिवराय नरवीर तानाजी मालुसरे की जय शुर वीर खंडोजी नाईक की जय या नाम घोषाने सर्व वातावरण कोळीवाडा अमृतेश्वर मंदिर दुमदुमले होते. शिवव्याख्याते ओंकार यादव यांनी इतिहास व बेल भंडारा का? उधळतात यांची माहिती दिली.


हा कार्यक्रम शुर वीर खंडोजी नाईक, वंशज घेरे सरनाईक दत्ताभाऊ जोरकर मा. पंचायत समिती सदस्य यांच्या नेतृत्व ,मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पाडला.या कार्यक्रमाचे नियोजन, व्यवस्था पंचमुखी मारुती मित्र मंडळ दुर्गदरा घेरा सिंहगड तरुण मंडळी यांनी केले .तर मान्यवरांचे स्वागत, सत्कार घेरा सिंहगड ग्रामपंचायत मा.सरपंच घेरे सरनाईक दत्तात्रय जोरकर,व शांताराम लांघे यांनी केले.
इतिहास, पंरपरा जपणे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी निष्ठा, शुर वीरांना मानवंदना, भक्ती भाव या भावनेतून हा कार्यक्रम दर वर्षी अष्टमीला शुर वीर खंडोजी नाईक वंशज, पंचमुखी मारुती मित्र मंडळ दुर्गदरा ,स्थानिक ग्रामस्थ तरूण मंडळी मोठ्या उत्साहाने कार्यक्रम करतात. ऐतिहासिक पंरपरा जपणे याचं उद्देशाने जागरण गोंधळ साजरा आदिवासी महादेव कोळी बांधव करतात.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें